शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एलआयसीच्या या खास पॉलिसीत मिळतो 7 पट परतावा, खर्चही कमी; चेक करा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 3:51 PM

1 / 7
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) योजना ग्राहकांना विविध प्रकारचे फायदे देत असतात. खात्रीशीर परतावा ही या योजनांची खासियत आहे. आपल्यालाही असे फायदे घेण्याची इच्छा असेल, तर आम्ही आपल्यासाठी एक अशी पॉलिसी घेऊन आलो आहोत, ज्यात किमान गुंतवणुकीत ग्राहकांना आपले पैसे वाढविण्याची संधी मिळेल.
2 / 7
LIC Jeevan Azaad पॉलिसीचे फायदे - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जीवन आझाद पॉलिसी, ही एक नॉन पार्टिसिपेटिंग विमा योजना आहे. एलआयसीने जानेवारी 2023 मध्ये ती लाँच केले. या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच 50,000 हून अधिक ग्राहकांनी जीवन आझाद पॉलिसी घेतली आहे.
3 / 7
या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. तसेच, पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिल्यास त्याला गॅरंटेड सम एश्योर्ड अमाउंट मिळते. पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक प्रीमियम्सची निवड करू शकतात.
4 / 7
प्लॅनचे फीचर्स - जीवन आझाद पॉलिसी ही नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग प्रीमियम एंडोमेंट पॉलिसी आहे. एलआयसी वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एलआयसी जीवन आझादअंतर्गत किमान बेसिक विमा रक्कम 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर कमाल बेसिक विमा रक्कम 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
5 / 7
या पॉलिसीतील महत्वाची गोष्ट म्हणजे, या पॉलिसीत आपल्याला मॅच्युरिटीपेक्षाही 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो. अर्थात, 18 वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल, तर आपल्याला फक्त 10 वर्षांसाठीच प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीत आपल्याला किमान 2 लाख रुपयांची, तसेच जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची विमा पॉलिसी मिळते.
6 / 7
जीवन आझाद पॉलिसी 3 महिन्यांच्या मुलापासून ते 50 वर्षांच्य व्यक्तीलाही काढता येते. लआयसी जीवन आजाद योजनेत गुंतवणुकीचा कालावधी कमिना 15 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांचा आहे.
7 / 7
मिळेल 7 पट परतावा - जर पॉलिसी काळात एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर पॉलिसी विकत घेताना घेण्यात आलेला बेसिक सम एश्योर्ड अथवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट परतावा नॉमिनीला दिला जाईल. महत्वाचे म्हणजे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेला एकूण प्रिमियम 105 टक्क्यांपेक्षा कमी नसावा.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा