शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Jeevan Saral Pension Plan: भन्नाट! LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये मिळणार 12 हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 9:36 PM

1 / 9
निवृत्तीनंतर किंवा उतार वयात प्रत्येकाला पैशांची गरज भासते. म्हातारपणी जास्त कष्ट करावे लागू नयेत, यासाठी योग्य वेळी नियोजन आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
2 / 9
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) प्रत्येक श्रेणीतील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना सुरू केल्या आहेत. लोकांच्या पेन्शनशी संबंधित गरज लक्षात घेऊन कंपनीने LIC सरल पेन्शन योजना सुरू केली आहे.
3 / 9
निवृत्तीनंतर जीवन सोपे बनवायचे असेल आणि दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहायचे नसेल, तर तुम्ही एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता.
4 / 9
देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकदाच पैसे जमा करावे लागतील. या योजनेत निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर किमान 12 हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळू शकते.
5 / 9
तुम्हाला मिळणारी पेन्शन तुमच्या खरेदी मूल्यावर अवलंबून असते. तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक आधारावर पेन्शन मिळवू शकता. या योजनेत तुम्ही एकट्याने किंवा जोडीदारासोबत गुंतवणूक करू शकता.
6 / 9
पॉलिसीधारक दोन अॅन्युइटी प्लॅनमधून एकरकमी योजना खरेदी करू शकतो. पहिल्या पर्यायांतर्गत, विमाधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि त्याच्या मृत्यूनंतर पेन्शन थांबेल आणि नॉमिनीला 100% रक्कम दिली जाईल.
7 / 9
दुसऱ्या पर्यायांतर्गत, विमाधारक आणि त्याच्या जोडीदारापैकी एकाच्या हयातापर्यंत पेन्शन दिली जाईल. दोघांच्या मृत्यूनंतर पेन्शन थांबेल आणि पॉलिसीच्या खरेदी किमतीच्या 100% नॉमिनीला दिले जातील.
8 / 9
हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल. 40-80 वयोगटातील लोक हा प्लॅन खरेदी करू शकतात. योजनेअंतर्गत, दरमहा किमान 1000 रुपये, तिमाही 3000 रुपये, सहामाही रुपये 6000 आणि वार्षिक 12000 हजार रुपये पेन्शनचा पर्याय आहे.
9 / 9
खरेदीच्या सहा महिन्यांनंतर तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता. सरेंडर केल्यानंतर खरेदी किमतीच्या 95 टक्के रक्कम परत केली जाईल आणि पॉलिसीवर कोणतेही कर्ज घेतले असल्यास ते वजा केल्यावर, उर्वरित रक्कम परत केली जाईल.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी