शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Jeevan Umang Policy: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये भरा फक्त ४४ रुपये अन् पुढील १०० वर्ष दरवर्षाला मिळवा ४० हजार रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 2:39 PM

1 / 8
देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. LIC च्या योजनेत गुंतवणूक करुन ग्राहक आपलं भविष्य सुरक्षित करतात. LIC ची अशीच एक जबरदस्त योजना आली आहे. याची माहिती आपण आज घेणार आहोत.
2 / 8
LIC च्या जीवन उमंग योजनेअंतर्गत (LIC Jeevan Umang Policy) गुंतवणूक करुन तुम्ही आपल्या कुटुंबाचं आणि तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. जीवन उमंग पॉलिसी एक एंडोमेंट प्लान आहे.
3 / 8
जीवन उमंग पॉलिसीमध्ये ९० दिवस ते ५५ वर्षांपर्यंतचा कोणताही व्यक्त गुंतवणूक करू शकतो. या पॉलिसीअंतर्गत १०० वर्षांपर्यंत लाइफ इन्श्युरन्स कव्हर प्राप्त होतो. तसंच पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर एक ठराविक रक्कम तुमच्या खात्यावर दरवर्षी जमा होते. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला एकरकमी पैसा मिळतो.
4 / 8
जर तुम्ही या पॉलिसीअंतर्गत दरमहा १,३२० रुपयांचा प्रिमिअम भरत असाल तर तुम्हाला तब्बल २८ लाख रुपये मिळू शकतात. १३२० रुपये प्रिमिअमनुसार दरवर्षाला तुमच्या खात्यावर १५,८४० रुपये जमा होतात. जर तुम्ही ही पॉलिसी घेत असाल तर दरदिवशी तुम्हाला फक्त ४४ रुपये जमा करावे लागतील.
5 / 8
तुम्ही जर ही पॉलिसी ३० वर्षांपर्यंत यशस्वीरित्या चालवली तर तुमचं प्रिमिअम रक्कम जवळपास ४ लाख ७५ हजार २०० रुपये इतकी होते. पण तुमच्या गुंतवणुकीवर LIC कडून ३१ व्या वर्षापासून दरवर्षी ४० हजार रुपये दिले जातील. म्हणजेच पुढील १०० वर्षांचं गणित केलं तर तुम्ही एकूण २७.६० लाख रुपये मिळवू शकता.
6 / 8
तुम्ही जर जीवन उमंग पॉलिसीमध्ये १५, २०, २५ किंवा ३० वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर एकरकमी रक्कम तुमच्या खात्यात टाकली जाईल. तसंच या पॉलिसी अंतर्गत आयकरात सेक्शन 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळवता येते.
7 / 8
पॉलिसी धारकाचा मृत्यू, अपघातात निधन किंवा दिव्यांग झाल्यास उमंग पॉलिसी अंतर्गत टर्म रायडरचा देखील लाभ मिळवता येतो.
8 / 8
तुम्हाला जर जीवन उमंग पॉलिसी काढायची असेल कमीत कमी दोन लाखांचा विमा काढणं अनिवार्य आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी