शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Kanyadan Policy : आपल्या मुलीच्या नावे दररोज १२१ रुपये वाचवा; लग्नाच्या वेळी एकत्र मिळतील २७ लाख, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 8:43 AM

1 / 9
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीन वर्षात गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आयुर्विमा महामंडळाची (LIC) कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy) ही मुलींसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे.
2 / 9
या योजनेचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणं हा आहे, म्हणून या पॉलिसीला एलआयसीनं कन्यादान पॉलिसी असं नाव दिलं आहे.
3 / 9
या योजनेचा उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणं हा आहे, म्हणून या पॉलिसीला एलआयसीनं कन्यादान पॉलिसी असं नाव दिलं आहे.
4 / 9
यासाठी मुलीचे वय १ वर्ष आणि पालकांचे किमान वय ३० वर्षे असणं अनिवार्य आहे. ही योजना २५ वर्षांची असेल, परंतु तुम्हाला २२ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे, परंतु यामुळे पॉलिसी मर्यादा कमी होईल आणि प्रीमियम वाढेल.
5 / 9
त्याच वेळी, पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास, कुटुंबाला उर्वरित प्रीमियम भरावा लागणार नाही.
6 / 9
अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळणार आहे. सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५ लाख रुपये मिळतील. मॅच्युरिटीपर्यंत कुटुंबाला दरवर्षी ५० हजार रुपयेही मिळतील.
7 / 9
LIC ची कन्यादान पॉलिसी सुरू करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. याशिवाय, स्वाक्षरी केलेला अर्ज आणि पहिल्या प्रीमियमसाठी चेक किंवा रोख तसेच जन्माचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
8 / 9
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज १२१ रुपये किंवा दरमहा ३६०० रुपये जमा करावे लागतील. हा प्रीमियम पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी २७ लाख रुपये मिळतील.
9 / 9
एलआयसी कन्यादान पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे याद्वारे तुम्ही केवळ बचतच करत नाही तर तुम्हाला आयकर सूटही मिळते. तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळवू शकता.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीmarriageलग्नIncome Taxइन्कम टॅक्स