शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC New Jeevan Shanti Policy: LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 9:10 AM

1 / 8
LIC New Jeevan Shanti Policy : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळत आहेत. परंतु ती गुंतवणूक जर योग्य ठिकाणी केली तर त्याचा आपल्याला फायदा मिळतो. आपल्याला निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि आपलं नियमित उत्पन्न सुरू राहावं यासाठी प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम काही ना काही बचत करताना गुंतविण्याची योजना आखत असतो.
2 / 8
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आजीवन पेन्शनची हमी देणारी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. या लोकप्रिय योजनांपैकी एक म्हणजे एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅन (LIC New Jeevan Shanti Plan), ज्याची विशेष गोष्ट म्हणजे यात एकदाच पैसे गुंतवावे लागतात आणि आयुष्यभरासाठी पेन्शन मिळत जातं.
3 / 8
एलआयसीकडे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी एक नव्हे तर अनेक उत्तम योजना आहेत. एलआयसीच्या निवृत्ती योजना खूप लोकप्रिय आहेत, ज्या विशेषत: निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात. एलआयसी न्यू जीवन शांती प्लॅनबद्दल बोलायचं झाले तर ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे आणि एकरकमी गुंतवणुकीद्वारे निवृत्तीनंतर तुम्हाला नियमित पेन्शनची हमी देते. तुम्हाला दरवर्षी १,००,००० रुपये पेन्शन मिळू शकते, तेही आयुष्यभरासाठी.
4 / 8
या पेन्शन पॉलिसीसाठी कंपनीनं ३० वर्षे ते ७९ वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. या योजनेत गॅरंटीड पेन्शनसोबतच इतर सर्व प्रकारचे फायदेही मिळतात. ही योजना खरेदी करण्यासाठी दोन पर्याय आहेत, पहिला सिंगल लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी आणि दुसरा जॉइंट लाइफसाठी डेफर्ड अॅन्युइटी. म्हणजेच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा हवं असेल तर कंबाइंड ऑप्शन निवडू शकता.
5 / 8
आता एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर १,००,००० रुपयांचे वार्षिक पेन्शन कसं मिळवता येईल हे पाहू. म्हटल्याप्रमाणे हा एक अॅन्युइटी प्लॅन आहे आणि तो खरेदी करून तुम्ही त्यात तुमची पेन्शन लिमिट ठरवू शकता. निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळत राहील. तसंच गुंतवणुकीवर उत्तम व्याज मिळते.
6 / 8
पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर जर एखाद्या ५५ वर्षीय व्यक्तीनं एलआयसी न्यू जीवन शांती योजना खरेदी करताना ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ती पाच वर्षे राहिल आणि ६० वर्षांनंतर त्याला दरवर्षी १,०२,८५० रुपये पेन्शन मिळण्यास सुरवात होईल. तुम्हाला हवं असेल तर ही रक्कम सहा महिन्यांत किंवा दर महिन्यालाही घेऊ शकता.
7 / 8
जर तुम्हाला दर सहा महिन्यांनी ही रक्कम हवी असेल तर ११ लाख रुपयांच्या एका गुंतवणुकीवर तुम्हाला १ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक पेन्शन मिळते, मग दर सहा महिन्यांनी घ्यायची असेल तर ती रक्कम ५०,३६५ रुपये असेल. दर महिन्याला पेन्शनचा हिशोब केला तर या गुंतवणुकीवर दरमहा ८,२१७ रुपये पेन्शन कन्फर्म होईल.
8 / 8
पेन्शनसोबतच एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गॅरंटीड पेन्शनसोबतच जे इतर फायदे मिळतात त्यात डेथ कव्हरचाही समावेश आहे. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यातील संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते. ११ लाखांच्या गुंतवणुकीवर नॉमिमीला मिळणारी रक्कम १२,१०,००० रुपये असेल. विशेष म्हणजे हा प्लॅन तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकता. त्यात कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता, तर त्यासाठी कमाल मर्यादा नाही.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकPensionनिवृत्ती वेतन