LIC news You can easily take loan on LIC policy Know the complete process
एलआयसी पॉलिसीवर कर्ज सहज काढू शकता, व्याजदरही कमी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 6:18 PM1 / 9LIC Loan : आपल्या सगळ्यांनाच पैशाची गरज असते, यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेत असतो. पण, अनेकवेळा बँका आपल्याकडे जमीन किंवा सोने गहान ठेवण्याची अट घालत असते. 2 / 9जर तुम्ही कोणत्याही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत लोक वैयक्तिक कर्जाकडे वळतात. तथापि, हा एक महाग पर्याय असू शकतो कारण तुम्हाला उच्च व्याजदरांचा सामना करावा लागू शकतो. सहसा हा व्याज दर 10 ते 15% पर्यंत असतो.3 / 9पण, आपल्याला एलआयसी पॉलिसीवरतीही कमी व्याज दरात कर्ज मिळू शकते.पण यासाठी तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असणे आवश्यक आहे.4 / 9जर तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर कर्ज मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही स्टॅन्डर्ड पूर्ण करावे लागतील. तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.5 / 9कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. कर्ज घेणारी व्यक्ती पॉलिसीधारक असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे वैध LIC पॉलिसी असणे आवश्यक आहे, यामध्ये किमान ३ प्रीमियम भरले असावेत.6 / 9एलआयसी पॉलिसीवरील कर्ज भारतीय ग्राहकांसाठी अनेक कारणांसाठी फायदेशीर आहे. पॉलिसीधारक त्याच्या सरेंडर रकमेच्या ८०%-९०% पर्यंत कर्ज घेऊ शकतो. एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेतल्यास, तुम्हाला वैयक्तिक कर्जापेक्षा कमी व्याजदर भरावा लागेल. यावर आकारले जाणारे व्याज एकूण रक्कम आणि प्रीमियम रक्कम भरण्याच्या वारंवारतेच्या आधारे मोजले जाते.7 / 9निश्चित रक्कम आणि प्रीमियमची रक्कम जितकी जास्त असेल तितका व्याजदर कमी होईल. LIC सुमारे १०-१२% व्याजदराने कर्ज घेते. यामध्ये कोणतीही अवघड प्रक्रिया नाही. एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेणे सुरक्षित आहे कारण ते पॉलिसीधारकाचे स्वतःचे पैसे असतात.8 / 9एलआयसीमध्ये आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन कर्ज घेता येते. पहिल्यांदा तुमच्या जवळच्या LIC शाखेत जा. त्यानंतर कर्जाचा अर्ज भरा यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ३-५ दिवसांत कर्ज तुमच्या खात्यावर जमा होते.9 / 9एलआयसीमधून तुम्हाला ऑनलाईनही कर्ज घेता येते. यासाठी तुम्हाला आधी एलआयच्या वेबसाईटवर जावे लागेल. यासाठी आधी रजिस्टर व्हावे लागेल. वेबसाईटवर लॉगइन करुन तुम्हाला ऑनलाईन टॅबवर क्लिक करुन कर्जासाठी अॅप्लिकेशन करता येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications