LIC Saral Pension Plan: you can start pension from age of 40, see details
LIC चा नवा प्लॅन! आता म्हातारपणी नाही, 40 व्या वर्षीच पेन्शन चालू होणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 6:32 PM1 / 10पेन्शन प्लॅन हे नेहमी फायद्याचे असतात. हे प्लॅन 60 वर्षांनंतरच्या बेगमीसाठी असतात. त्याच्या आधी आपल्याला या पेन्शन प्लॅनमध्ये पैसे गुंतवावे लागतात. परंतू LIC ने असा प्लॅन लाँच केला आहे, ज्याद्वारे 40 च्या वयातच पेन्शन मिळणार आहे. यामध्ये फक्त मासिक हप्त्याऐवजी एकत्र रक्कम भरावी लागते. (LIC Saral Pension Plan, pension start from age of 40.)2 / 10हा प्लॅन अशा लोकांसाठी चांगला आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत परंतू महिन्याच्या महिन्याला उत्पन्न नाहीय. अशावेळी ते त्यांच्याकडील पैसे मंथली पेन्शनच्या रुपात सुरक्षित गुंतवू शकतात. (how to start pension from age 40.) 3 / 10एलआयसीची ही सरल पेन्शन योजना कोरोना काळात लाँच करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांनी कर्ताधर्ता, कमविणारा व्यक्ती गमावला आहे. यामुळे अशा कुटुंबांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. 4 / 10महिला त्यांच्या पतीची सेव्हिंग एलआयसीच्या या योजनेत गुंतवून चांगले उत्पन्न घेऊ शकतात. यातून मुलांचे शिक्षण, लग्न आदी कामे होऊ शकतात. तसेच हे पैसेदेखील सुरक्षित राहणार आहेत. 5 / 10एलआयसीने सरळ पेन्शन योजना (Saral Pension) जारी केली आहे. यामध्ये असे काही फीचर आहेत, जे आधीच्या योजनेत नव्हते. म्हणजेच तुम्ही 40 ते 80 वर्षांच्या काळात कधीही या योजनेत पैसे गुंतवून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. . (how to get pension from age 40.) 6 / 10महत्वाचे म्हणजे ही पेन्शन आजीवन मिळणार आहे. ही योजना लाईफ अॅन्युईटी विथ 100 पर्सेंट रिटर्न ऑफ पर्चेस प्राईस सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजेच ही योजना एका व्यक्तीशी जोडलेली असेल. पेन्शनधारक जोवर जिवंत असेल तोवर त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बेस प्रिमिअम मिळणार आहे. 7 / 10दुसरा फायदा म्हणजे, ही पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी देण्यात येते. यामध्ये पती किंवा पत्नी जो देखील एकाच्या मृत्यूनंतर जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळत राहणार आहे. जेव्हा दोन्हीही मृत होतील तेव्हा त्याच्या नॉमिनीला बेस प्राईज मिळेल. 8 / 10आणखी एक महत्वाची सोय म्हणजे ही योजना घेतल्यानंतर सहा महिन्यांतच या योजनेवर कर्ज काढता येणार आहे.9 / 10जर तुमचे वय 40 वर्षे आहे आणि तुम्ही 10 लाखांचा सिंगल प्रमिअम भरला आहे, तर तुम्हाला वर्षाला 50250 रुपये पेन्शन मिळणार आहे. जर तुम्हाला काही गरज भासली आणि मध्येच पैसे परत हवे असतील तर 5 टक्के कपात केली जाणार आहे. 10 / 10ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात मिळते. अधिक माहितीसाठी एलआयसी ऑफिस किंवा वेबसाईटवर भेट द्या. भविष्य सुरक्षित करा. आणखी वाचा Subscribe to Notifications