शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Scheme for Daughter: ₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:08 AM

1 / 9
भविष्याचा विचार करून अनेक जण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. परंतु योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदाही होतो. मुलीच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. तिच्या जन्माबरोबरच पालकांना शिक्षणापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो.
2 / 9
मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलीचा जन्म होताच तिच्यासाठी आर्थिक नियोजन सुरू करणं गरजेचं आहे. आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्या विशेषत: मुलींसाठी चालवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे एलआयसीची कन्यादान पॉलिसी.
3 / 9
या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीसाठी २२.५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम गोळा करू शकता. तसंच या योजनेच्या माध्यमातून टॅक्स बेनिफिट्स, लोन सुविधा आणि इतर अनेक बेनिफिट्सचा लाभही घेता येईल. जर तुमच्या मुलीचं वय १ वर्ष ते १० वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
4 / 9
या योजनेचा पॉलिसी कालावधी १३-२५ वर्षांचा आहे. यासाठी तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जर तुम्ही २५ वर्षांचा टर्म प्लॅन निवडला तर तुम्हाला २२ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. ही स्कीम २५ वर्षांनंतर मॅच्युअर होईल. मॅच्युरिटीच्या वेळी सम एश्योर्ड + बोनस + फायनल बोनससह पूर्ण रक्कम दिली जाते. ही पॉलिसी घेण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत असू शकतं, अशी अट यामध्ये आहे.
5 / 9
पॉलिसी खरेदी केल्यावर तिसऱ्या वर्षापासून कर्जाची सुविधाही दिली जाते. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी सरेंडर करायची असेल तर ती सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय प्रीमियम भरण्यासाठीही ग्रेस पीरियड आहे. समजा जर तुम्ही एका महिन्यात पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास विसरलात तर तुम्ही ३० दिवसांच्या ग्रेस पीरियडमध्ये प्रीमियम भरू शकता. या दरम्यान तुमच्याकडून कोणतंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही.
6 / 9
इतकंच नाही तर ही पॉलिसी घेतल्यावर दोन प्रकारे टॅक्स बेनिफिटही मिळतं. प्रीमियम जमा केल्यावर ८० सी अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो आणि मॅच्युरिटीची रक्कम कलम १० डी अंतर्गत करमुक्त असते. पॉलिसीसाठी किमान विम्याची मर्यादा १ लाख रुपयांपासून सुरू होते आणि कमाल मर्यादा नाही.
7 / 9
समजा तुम्ही २५ वर्षांचा टर्म प्लॅन घेतला आणि ४१,३६७ रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरला. अशावेळी तुमचा मासिक प्रीमियम ३,४४७ रुपयांच्या आसपास असेल. हा प्रीमियम तुम्ही २२ वर्षांसाठी जमा कराल. अशा परिस्थितीत २५ वर्षांच्या कालावधीत २२.५ लाखांचे विमा संरक्षण मिळेल.
8 / 9
पॉलिसीच्या कालावधीत वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला भविष्यातील टर्मसाठी प्रीमियम भरावा लागणार नाही. अशा वेळी प्रीमियम माफ केला जातो. याशिवाय २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तिला वार्षिक १ लाख रुपये आणि २५ व्या वर्षी एकरकमी मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल.
9 / 9
जर वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर, नॉमिनीला सर्व डेथ बेनिफिट्ससह १० लाख रुपयांचा अपघाती मृत्यू लाभ दिला जाईल. पॉलिसीशी संबंधित अधिक माहितीसाठी https://lifeinsuranceofindia.in/lic-kanyadan-policy/ या लिंकवर क्लिक करुन माहिती घेऊ शकता.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूक