शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC चा शेअर आणखी खोलात! गुंतवणूकदारांची चिंता वाढली; नफ्याला घरघर लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 4:34 PM

1 / 9
आताच्या घडीला शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सुमारे १.६ लाख कोटी रुपयांचे IPO अडकले आहेत. कंपन्या आणि गुंतवणूकदार बाजार पूर्वपदावर येण्याची वाट पाहत आहेत. सुमारे ८९ हजार कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. परंतु, बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता कंपन्या आयपीओ आणण्याचे साहस करण्याच्या विचारात दिसत नाहीत.
2 / 9
यातच वाजत-गाजत शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा शेअरही आणखी खोलात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या प्राइजला आयपीओ सादर करण्यात आला होता. त्यापेक्षाही खाली शेअर ट्रेडिंग करत असल्याने गुतंवणूकदारांची चिंता वाढली आहे.
3 / 9
भांडवली बाजारात पदार्पणातच निराशाजनक कामगिरी करणाऱ्या LIC चा शेअर आणखी घसरला. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत LIC नफ्यात १७ टक्के घसरण झाली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले.
4 / 9
LIC चा शेअर ३ टक्क्यांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 'एलआयसी'च्या शेअरवर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र निराशाजनक आर्थिक कामगिरीचा फटका शेअरला बसला.
5 / 9
आताच्या घडीला LIC चा शेअर बीएसईवर ८१७.१५ रुपयांवर आहे. त्यात २.३८ टक्के घसरण झाली आहे. त्याआधी इंट्रा डेमध्ये 'एलआयसी'चा शेअर ८१० रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला होता.
6 / 9
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) मंचावर LIC शेअर ८१७.५० रुपये असून त्यात २.४७ टक्के घसरण झाली. दरम्यान सोमवारी निकालांच्या पार्श्वभूमीवर 'एलआयसी'चा शेअर २ टक्क्यांनी वधारला होता. LIC ने ३० मे २०२२ रोजी चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला.
7 / 9
जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत महामंडळाला २,४०९.३९ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात १७.४१ टक्के घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला २,९१७.३३ कोटींचा नफा झाला होता.
8 / 9
या तिमाहीत LIC चे निव्वळ उत्पन्न १,४४,१५८.८४ कोटी इतके राहिले. त्यात १७.८८ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला १,२२,२९०.६४ कोटींचा महसूल मिळाला होता.
9 / 9
LIC ला गुंतवणुकीतून चौथ्या तिमाहीत ६७,८५५.५९ कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात गत वर्षाच्या तुलनेत किंचित वाढ झाली. दुसरीकडे सेबीच्या कठोरतेमुळे काही आयपीओंना अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी अनेक बाबींवर कंपन्यांचे मूल्यांकन तपासत आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीLic IPOएलआयसी आयपीओshare marketशेअर बाजार