शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लयभारी! LIC ची जबरदस्त योजना, एकदाच पैसे भरा आणि १४ लाख मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 8:02 PM

1 / 8
एलआयसीची एक मस्तच सिंगल प्रीमिअम पॉलिसी आहे. या योजनेत तुम्ही एकदाच १० ते २५ वर्षांसाठी पैसे गुंतवले की तुम्हाला अखेरीस जबरदस्त रिटर्न्स मिळतात.
2 / 8
बँकेतील मुदत ठेवीशी तुलना केल्यास एलआयसीची वन टाइम प्रिमिअम योजना खूप सरस ठरते. एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एलआयसीची योजना खूप फायदेशीर ठरते.
3 / 8
एलआयसीच्या या योजनेत तुम्ही कमीत कमी ९० दिवस तर जास्तीत जास्त ६५ वर्षांसाठीची एकरकमी गुंतवणूक करू शकता. योजनेची कमाल मॅच्युरिटी ७५ वर्ष इतकी आहे. योजनेची मुदत १० ते २५ वर्षांची असते.
4 / 8
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यास आयकरात देखील ८० सी अंतर्गत करकपातीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तर मृत्यूलाभ १०(१०डी) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त आहे.
5 / 8
एलआयसीच्या या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम ५० हजार इतकी आहे. तर कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही ५० हजारांच्या वर ५ हजारच्या पटीत कितीही रक्कम यात एकरकमी पद्धतीनं गुंतवणूक करू शकता.
6 / 8
या योजनेत मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट असे दोन्ही पर्याय उपलब्ध होतात. म्हणजेच योजनेची मुदत संपल्यानंतर लाभार्थ्याला मॅच्युरिटीचा पूर्ण लाभ मिळतो. तर मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला योजनेचा लाभ मिळतो.
7 / 8
आकडेवारीवर नजर टाकल्यास या योजनेतून होणाऱ्या लाभ दिसून येईल. सध्याच्या घडीला या योजनेत २.४ लाख रुपये गुंतवले तर त्यावर ६ टक्के व्याजदरानं २५ वर्षांनंतर तुम्हाला १०.२० लाख रुपये मिळतील. तर ७ टक्के व्याजदरानुसार १२.९० लाख रुपये मिळतात.
8 / 8
त्याच पद्धतीनं योजनेत २.४ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २५ वर्षांनंतर लाभार्थ्याला १३.६२ लाख रुपये मिळतात. यातही २४ व्या वर्षी लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास तर मॅच्युरिटीनंतर नॉमिनीला १२.८७ लाख रुपये मिळतात.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसाय