शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC ULIP Plan : महिन्याला ३ हजार रूपयांच्या रकमेतून मिळवा ७ लाख रूपये; हेदेखील होतील फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 4:06 PM

1 / 7
देशातील सरकारी विमा कंपनी एलआयसीकडे सामान्य नागरिकांसाठी अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडातून पैसे कमावू इच्छित असाल आणि बाजारातील जोखमीशिवाय तुम्हाला उत्तम रिटर्न मिळत असतील तर LIC चा हा प्लॅन उत्तम आहे.
2 / 7
या प्लॅनचं नाव आहे एसआयआयपी प्लॅन. एलआयसीचा हा प्लॅन एक युनिट लिंक्ड प्लॅन आहे. जर तुम्ही १० वर्षांसाठी एखादी पॉलिसी घेतली आहे आणि त्याचा वार्षिक हप्ता ४० हजार रूपये इतका आहे, तर तुम्हाला महिन्याला ३३३३ रूपयांचा हप्ता बसतो.
3 / 7
१० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला १०५ टक्के रिटर्न म्हणजे ४.२० लाख रूपये मिळतात. यासाठी आणखी एख गोष्ट समजून घेतली पाहिजे.
4 / 7
तुम्ही १० वर्षांच्या हिशोबानं ३३३३ रूपयांप्रमाणे ३,९९,९६० रूपयांची रक्कम जमा करता. जेव्हा तुम्ही १० वर्ष पूर्ण केली म्हणून तुम्हाला तेव्हाच्या एनएव्ही आणि रिटर्नुसार ३,०८,०६८ रूपयांचा नफा मिळेल. याचाच अर्थ १० वर्षांनंतर तुम्हाला ७,०८,०२८ रूपये मिळतील.
5 / 7
जसा पॉलिसीचा कालावधी वाढत जाईल तेवझी तुमची गॅरंटीड इन्कमची टक्केवारी वाढत जाईल. या स्कीममध्ये तुम्हाला अनेक रायडर्स निवडण्याचाही पर्याय आहे.
6 / 7
जर पॉलिसीधारकाचा या कालावधीदरम्यान मृत्यू झाला तर नॉमिनीला एकूण प्रीमिअमच्या १०५ टक्के रिटर्न मिळतो. तर पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकूण रकमेच्या १०५ टक्के रिटर्न मिळतो.
7 / 7
या पॉलिसीची विशेष बाब म्हणजे यात रक्कम दुप्पट होण्यासोबतच तुम्हाला अन्यही फायदे मिळतात. यामध्ये तुम्ही मध्यातूनही पैसे काढू शकता. तसंच फंड स्विच करण्याची सुविधा, बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुविधा, प्री लूक पिरिअडची सुविधा आणि याशिवाय या पॉलिसीवर तुम्ही लोनही घेऊ शकता.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसाInvestmentगुंतवणूक