शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC ची जबरदस्त स्कीम, 58 रुपयांच्या बचतीवर मिळवा 8 लाखांचा फंड; जाणून घ्या फॉर्मूला..!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 8:45 PM

1 / 6
जेव्हा आपण कमाई करू लागतो, तेव्हा गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधतो. बरेच लोक चांगली कमाई करतात, पण त्यांचा बँक बॅलन्स नेहमीच कमी असतो. पैसा वाढवण्यासाठी चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे चांगले असते. गुंतवणुकीसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. या सरकारी योजनांमध्ये पैशाचा धोका नसून मॅच्युरिटीवरही मोठी रक्कम जमा होते.
2 / 6
आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अल्प रक्कम जमा करून चांगली बचत करू शकता. ही योजना एलआयसीची आहे. LIC वेगवेगळ्या वयोगटातील लोकांपासून ते महिलांसाठी वेळोवेळी पॉलिसी काढत असते. ज्यामध्ये गुंतवणूक करून लोक काही वर्षांनी भरीव रक्कम मिळवू शकतात.
3 / 6
एलआयसी आधार शिला पॉलिसी- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या समाजातील प्रत्येक वयोगटासाठी योजना आहेत. LIC आधार शिला पॉलिसी ही सरासरी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी चांगली योजना आहे. याची किमान रक्कम 75000 रुपये आणि कमाल 3 लाख रुपये आहे. एलआयसी आधार शिला योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही दररोज छोटी रक्कम जमा करू शकता.
4 / 6
बहुतेक एलआयसी पॉलिसींप्रमाणे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यात व्यक्तीला मृत्यू कवचदेखील मिळते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 58 रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर लाखो रुपये मिळतील. मृत्यूवरील पॉलिसीची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या सात पट आणि मूळ विमा रकमेच्या 110% आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 8 वर्षे आणि कमाल 55 वर्षे आहे. पॉलिसीची कालमर्यादा 10 ते 20 वर्षे आहे.
5 / 6
अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 8 लाख रुपये मिळतील- समजा, वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेत सलग 20 वर्षे दररोज 58 रुपये जमा केले, तर तुमच्या पहिल्या वर्षी एकूण 21918 रुपये जमा होतील. ज्यावर तुम्हाला 4.5 टक्के दराने करही भरावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 21446 रुपये द्यावे लागतील.
6 / 6
अशा प्रकारे, तुम्ही हा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा कराल. दरवर्षी प्रीमियम भरल्यावर तुम्ही 20 वर्षांसाठी 429392 रुपये जमा कराल. यानंतर, मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 794000 रुपये मिळतील.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसाय