शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LICची जबरदस्त पॉलिसी; 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 17 लाख रुपयांचा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 7:22 PM

1 / 8
LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम योजना देत असते. तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह लक्षाधीश होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही एलआयसी पॉलिसी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
2 / 8
LIC जीवन लाभ योजना ही एक अशी पॉलिसी आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा फक्त 233 रुपये जमा करुन 17 लाखांचा निधी मिळवू शकता. जाणून घ्या या योजनेबद्दल...
3 / 8
एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन-लिंक्ड पॉलिसी असल्यामुळे या पॉलिसीचा शेअर बाजाराशी कोणताही संबंध नाही. बाजार वर गेला किंवा खाली आला, त्याचा तुमच्या पैशांवर अजिबात परिणाम होणार नाही.
4 / 8
म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही मर्यादित प्रीमियम योजना आहे. मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्तेची खरेदी लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे.
5 / 8
LIC ची जीवन लाभ योजना नफा आणि संरक्षण दोन्ही देते. 8 ते 59 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी सहज घेऊ शकतात.
6 / 8
पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकते. या पॉलिसीत 2 लाख रुपयांची किमान विमा रक्कम घेणे आवश्यक आहे, कमाल रकमेवर मर्यादा नाही.
7 / 8
या पॉलिसीत 3 वर्षांचा प्रीमियम भरल्यावर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. प्रीमियमवर कर सूट आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूवर, नॉमिनीला विमा रक्कम आणि बोनसचे फायदे मिळतात.
8 / 8
यात नॉमिनीला डेथ सम अॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस डेथ बेनिफिट म्हणून मिळतो. म्हणजेच, नॉमिनीला अतिरिक्त विम्याची रक्कम मिळेल.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी