शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC ने बंद केल्या ‘या’ २ पॉलिसी! तुमच्या पैशांचे काय होणार, तुम्हीही घेतली होती का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 8:54 PM

1 / 9
भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वांत मोठी आणि आघाडीची कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोकांनी LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही.
2 / 9
यातच एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. LIC ने दोन पॉलिसी बंद केल्या आहेत. ज्या ग्राहकांनी ही पॉलिसी घेतलेली आहे, ते पैशांसाठी चिंतेत आहे. मात्र, ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही कारण जुनी पॉलिसी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
3 / 9
फक्त LIC च्या नवीन ग्राहकांना आता ही नवीन पॉलिसी खरेदी करता येणार नाही, असे सांगितले जात आहे. विमा दर वाढल्यामुळे एलआयसीने दोन्ही पॉलिसी बंद केल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
LIC ने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१९ मध्ये या पॉलिसी लॉंच केल्या होत्या. या दोन्ही पॉलिसी लाँच केल्यानंतर त्यांचे प्रीमियम वाढवले ​​गेले नाहीत.
5 / 9
मात्र, LIC लवकरच बंद करण्यात आलेल्या पॉलिसी नवीन प्रीमियमसह लॉन्च करेल, असे सांगितले जात आहे. LIC जीवन अमर (LIC Jeevan Amar) आणि LIC टेक टर्म (LIC Tech Term Plan) अशी या बंद केलेल्या पॉलिसींची नावे आहेत.
6 / 9
विद्यमान LIC टर्म प्लॅन पॉलिसीधारकांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही. विद्यमान पॉलिसी सुरूच राहणार आहे. ज्या ग्राहकांनी एलआयसी पॉलिसी टेक टर्म किंवा एलआयसी जीवन अमर प्लॅन या दोन्ही पॉलिसी घेतल्या आहेत त्या सुरूच राहतील.
7 / 9
ही पॉलिसी बंद झाली म्हणजे भविष्यात या पॉलिसींची विक्री होणार नाही. ज्या ग्राहकांनी २२ नोव्हेंबरपर्यंत या दोन्ही विम्याचा हप्ता खरेदी केला आहे किंवा भरला आहे, त्यांना सदर पॉलिसी मिळेल. पॉलिसी स्वीकारल्यानंतर ग्राहकांना पॉलिसी मिळेल.
8 / 9
दोन्ही पॉलिसींमध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळते. ही पॉलिसी १० ते ४० वर्षांची आहे. LIC जीवन अमर योजनेसह ग्राहक किमान विमा रक्कम २५ लाख रुपये आणि LIC टेक टर्म प्लॅनसह ५० लाख रुपये घेऊ शकतात.
9 / 9
यामध्ये कमाल विम्याची मर्यादा नव्हती. एलआयसी टेक टर्म प्लॅन ऑनलाइन टर्म इन्शुरन्स योजना LIC जीवन अमर ऑफलाइन प्लॅनपेक्षा स्वस्त होती.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी