शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC New Policy: LIC नं आणली नवी विमा पॉलिसी, जाणून घ्या Bima Ratna पॉलिसीचे डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 3:59 PM

1 / 9
LIC ने आज नवी पॉलिसी लॉन्च केली आहे. एलआयसी विमा रत्न (LIC Bima Ratna) नावानं नवी पॉलिसी लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीनं स्टॉक एक्चेंजला देखील या नव्या पॉलिसीबाबत माहिती दिली आहे.
2 / 9
BSE ला दिलेल्या माहितीनुसार LIC Bima Ratna पॉलिसी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इंडिव्ह्युज्युअल, सेविंग्ज लाइफ इंश्योरन्स प्लान आहे. एलआयसीचे शेअर्स १७ मे रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. ९४९ रुपये इशू प्राइज असलेला शेअर ८७२ रुपयांपर्यंत पहिल्याच दिवशी खाली उतरला. आजचा एलआयसीच्या शेअरचा भाव ८२०.८५ रुपये इतका आहे.
3 / 9
स्टॉक एक्स्चेंजला दिल्या गेलेल्या माहितीनुसार एलआयसी ३० मे रोजी कंपनीच्यावतीनं ऑडिट अहवाल, तिमाहीचा अहवाल आणि संपूर्ण वित्त वर्षाच्या कंपनीच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती जाहीर करणार आहे. जर कंपनीच्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंट देण्याचा निर्णय झाला तर तोही त्याच दिवशी जाहीर केला जाऊ शकतो.
4 / 9
एलआयसीची नवी पॉलिसी स्थानिक पातळीवर कामकाज करणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. नव्या पॉलिसीबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती जाही करण्यात आलेली नाही.
5 / 9
एलआयसीनं BSE ला लिहिलेल्या पत्रकात नव्या पॉलिसी संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात या Bima Ratna पॉलिसीबाबत सविस्तर माहिती देण्यात येऊ शकते.
6 / 9
३० मे रोजी एलआयसीकडून कंपनीच्या कामगिरीचा अहवाल जारी करण्यात येणार आहे. याच दिवशी नव्या पॉलिसीचीही माहिती सार्वजनिक केली जाण्याची शक्यता आहे.
7 / 9
एलआयसीने याआधी डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा अहवाल सादर केला होता. कंपनीला आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २३५ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
8 / 9
एलआयसीच्या आयपीओबाबतही मोठी उत्सुकता सर्वांना होती. तब्बल २१ हजार कोटींचा आयपीओ देखील लॉन्च झाला. पण असं असतानाही एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी फ्लॉप ठरताना दिसला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना नुकसानाला सामोरं जावं लागलं.
9 / 9
पण आता कंपनीकडून ३० मे रोजी अहवाल सादर केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानं त्यादिवशी शेअर बाजारात काहीतरी हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. फक्त एलआयसी जाहीर करणार असलेल्या अहवालामुळे शेअर बाजारावर त्याचा नेमका कसा परिणाम पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीLic IPOएलआयसी आयपीओ