शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC पॉलिसीला ३१ मार्चपर्यंत करा पॅनशी लिंक, अन्यथा.., जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 6:00 PM

1 / 8
LIC Pan Linking: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या पॉलिसींशी PAN लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली आहे. ग्राहकांनी त्यांच्या पॉलिसी पॅन कार्डाशी लिंक कराव्यात असे एलआयसीने एका अधिसूचनेत म्हटले आहे.
2 / 8
जर तुम्ही अद्याप एलआयसीला पॅनकार्डशी लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी हे काम पूर्व करावे लागणार आहे. तुमच्या एलआयसी पॉलिसीशी पॅन कार्ड कसं लिंक करता येईल हे आपण आज समजून घेऊ.
3 / 8
ग्राहकांना एलआयसी इंडियाच्या वेबसाइट- linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/getPolicyPANStatus वर भेट देऊन त्यांच्या पॉलिसी क्रमांकासह पॅन लिंक करावे लागेल. तुम्ही तुमची LIC पॉलिसी ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या पॅन कार्डाशी ऑनलाइन लिंक करू शकता.
4 / 8
Linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/getPolicyPANStatus ही LIC India ची लॉग इन करण्यासाठी थेट URL आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा पॉलिसी क्रमांक टाइप करा.
5 / 8
यानंतर तुमचा पॅन नंबर, कॅप्चा कोड आणि तुमची जन्म तारीख टाका. ही माहिती टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. काही वेळात एलआयसी आणि पॅनचं स्टेटस तुम्हाला दिसेल. जर तुमची पॉलिसी लिंक नसेल तर तुम्हाला एक मेसेज येईल.
6 / 8
तुमचा पॅन तुमच्या पॉलिसीशी लिंक केलेला नसल्यास, तुम्हाला ‘click here to register your PAN with us’ असा संदेश दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुम्हाला माहिती द्यावी लागेल. तुमचे पॅन कार्ड एलआयसी इन्शुरन्सशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला एलआयसी इंडिया वेबसाइट linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/home वर लॉग इन करणे आवश्यक आहे.
7 / 8
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या थेट URL वर म्हणजेच https://licindia.in/Home/Online-PAN-Registration वर लॉग इन करा. यानंतर तुमचा पॅन नंबर, कॅप्चा कोड आणि तुमची जन्म तारीख टाका.
8 / 8
ही प्रक्रिया केल्यानंतर पॅनसह तुमचा ईमेल आयडी टाका. यानंतर तुमचं पूर्ण नाव, फोन आणि पॉलिसी क्रमांक लिहा. कॅप्चा पूर्ण करा आणि गेट ओटीपीवर क्लिक कारा. त्यानंतर ओटीपी टाका तुमची पॉलिसी पॅन कार्डाशी लिंक होईल.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीPan Cardपॅन कार्ड