Loan on Mutual Fund: Need money in times of crisis? Mutual fund loan is an option
Loan on Mutual Fund: संकटकाळी पैसे हवेत? म्युच्युअल फंडावर कर्जाचा आहे पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:24 AM1 / 7म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही मध्यम ते दीर्घ काळाच्या उद्दिष्टांसाठी केलेली गुंतवणूक असते. मात्र अचानक पैशांची गरज पडल्यास अनेक जण ही गुंतवणूक मुदतीपूर्वीच रिडिम करतात. म्हणजेच काढून घेतात. 2 / 7त्यामुळे गुंतवणूकदारांच्या उद्दिष्टास धक्का लागतो. गुंतवणूक रिडिम करण्याऐवजी गुंतवणूकदार म्युच्युअल फंडावर कर्ज घेऊ शकतात. त्यात गुंतवणूक सुरक्षित राहते आणि गुंतवणूकदाराची तातडीची गरजही भागते.3 / 7अनिवासी भारतीय, संस्था, अविभक्त हिंदू कुटुंबे, विश्वस्त संस्था, कंपन्या आणि कोणतीही संस्था म्युच्युअल फंड युनिटवर कर्ज मिळण्यास पात्र आहेत. अल्पवयीनांना कर्ज मिळत नाही. कर्जाची रक्कम, कालावधी व व्याजदर याचा निर्णय बँका व वित्तीय संस्था घेतात. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कमी व्याजदर लागतो.4 / 7म्युच्युअल फंडावर किती कर्ज मिळेल, हे फंडाच्या प्रकारावर अवलंबून आहे. तुमच्याकडे ‘इक्विटी फंड’ असल्यास त्याच्या शुद्ध संपत्ती मूल्याच्या ५० टक्के कर्ज तुम्हाला मिळू शकते. ‘फिक्स्ड इन्कम फंड’ असल्यास त्याच्या शुद्ध संपत्ती मूल्याच्या ७० ते ८० टक्के कर्ज मिळू शकते.5 / 7बँक अथवा वित्तीय संस्थेत कर्जासाठी अर्ज करावा लागतो. अनेक वित्तीय कंपन्या ऑनलाइन अर्जाची सुविधा देतात. कर्जाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करून मंजुरीही ऑनलाइनच मिळू शकते. विशेष म्हणजे यातील तारण प्रक्रियाही (लिएन मार्किंग) ऑनलाइन करता येते. त्यामुळे हे कर्ज फारच सुलभतेने मिळते.6 / 7म्युच्युअल फंडावर मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरापेक्षा खूपच कमी असतो. कारण यात तारण असते. बँका अथवा वित्तीय संस्थांना कर्ज बुडण्याची भीती नसते. कर्ज घेण्यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क एक तर नाममात्र असते अथवा अनेकदा माफही केले जाते. त्यामुळे कर्ज इतर कर्जांच्या तुलनेत फायदेशीर ठरते.7 / 7काही कर्जाची परतफेड केल्यास परतफेडीच्या प्रमाणात म्युच्युअल फंड युनिट्स तारणमुक्त केले जातात. तारण असतानाही युनिट्सवर लाभांश आणि इतर लाभ मिळत राहतात. तारण दिलेले युनिट गुंतवणूकदारास रिडिम करता येत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications