शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lockdown: जाणून घ्या, पेटीएमची नवी ऑफर! आता १ लाखांपर्यंत खरेदी करा अन् बिलाचं नो टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:22 PM

1 / 10
पेटीएमने व्यवसाय वाढवण्यासाठी पोस्टपेड सुविधेची मर्यादा वाढवली आहे. या अंतर्गत काही ऑफलाईन स्टोअर्स आणि दुकानांमध्ये तुम्ही पेटीएमद्वारे पैसे भरु शकता, याचे बिल तुम्हाला पुढील महिन्यात भरण्याची मुभा दिली आहे.
2 / 10
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने डिजिटल व्यवहारांवर अधिक भर देण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन काळात पेटीएमने यासाठी ४ पटीने व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 10
पेटीएमची पोस्टपेड सेवा रिलायन्स फ्रेश, हळदीराम, अपोलो फार्मसी, क्रोमा, शॉपर्स स्टॉप इत्यादी येथे वापरली जाऊ शकते. या सेवेचा उपयोग करून, लोक आसपासच्या दुकानातून किराणा सामान, दुध आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात.
4 / 10
पेटीएम पोस्टपेडचा वापर करून डोमिनोज, टाटा स्काय, पेपरफ्राय, हंगरबॉक्स, पतंजली, स्पेंसरची बिलेही भरली जाऊ शकतात.
5 / 10
पेटीएमने दोन एनबीएफसींच्या भागीदारीत ही पोस्टपेड सेवा सुरू केली आहे. त्याअंतर्गत पेटीएम ग्राहक आता वस्तू खरेदीसाठी पैसे देऊ शकतात, परंतु पुढच्या महिन्यात त्यांना पैसे द्यावे लागतील.
6 / 10
पेटीएमने यासाठी दरमहा १ लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. केवळ निवडक युजर्सच्या आर्थिक सेवांमध्ये पोस्टपेड चिन्ह दिसेल, पेटीएमने वापरकर्त्यांचे लाइट, डिलाइट आणि एलिटचे तीन प्रकार जाहीर केले आहेत.
7 / 10
पोस्टपेड लाईटअंतर्गत २० हजार रुपयांची मर्यादा उपलब्ध होईल आणि मासिक बिलात काही शुल्क आकारण्यात येईल.
8 / 10
डिलाईट आणि एलिट ग्राहकांसाठी ही मर्यादा २० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत सुरू होईल आणि त्यांच्या मासिक बिलामध्ये कोणताही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.
9 / 10
युजर्सला पोस्टपेडचा पर्याय देण्यापूर्वी भागीदार एनबीएसीद्वारे क्रेडिट प्रोफाइल पाहिले जाईल. ग्राहकांना एबीएफसी भागीदार सह ऑनलाइन केवायसी पूर्ण करावे लागेल. हे बिल प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत भरावे लागेल.
10 / 10
कंपनीने असं म्हटलं आहे की लाईट व्हर्जन त्यांच्यासाठी आहे ज्यांची क्रेडिट स्कोअर चांगला नाही, परंतु तेदेखील ही सुविधा काही अतिरिक्त पैसे भरून वापरु शकतात.
टॅग्स :Paytmपे-टीएमcorona virusकोरोना वायरस बातम्या