शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंजिनिअरला दरमहिना २१ हजार सॅलरी ऑफर करणाऱ्या IT कंपनीच्या CEO चा पगार तर बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:34 PM

1 / 10
आयटी कंपनी कॉग्निजेंटनं कॅम्पस हायरिंगमध्ये इंजिनिअरला वर्षाकाठी २.५० लाखाचे पॅकेज ऑफर केलं आहे. त्यावरून सोशल मीडियात बरेच मीम्स व्हायरल झालेत. अनेकांनी वर्षाला २.५० लाख म्हणजे महिन्याला २१ हजार पगाराची खिल्ली उडवली आहे.
2 / 10
पण तुम्हाला माहिती आहे का, फ्रेशर्सला २.५० लाखांचे किरकोळ पॅकेज देणाऱ्या कॉग्निजेंट कंपनीच्या सीईओचा पगार किती असेल? कॉग्निजेंट कंपनीचे सीईओ रवी कुमार यांच्या पॅकेजची चर्चा त्याचवेळी झाली जेव्हा ते या कंपनीत सीईओ म्हणून नियुक्त झाले.
3 / 10
रवी कुमार एस हे यापूर्वी इन्फोसिसचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षी ते कॉग्निजेंट कंपनीचे सीईओ बनले. यावेळी त्यांच्या पगाराने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. २०२० मध्ये हा पगार मुकेश अंबानींच्या पगारापेक्षा हे चार पट जास्त असल्याचे सांगण्यात आले.
4 / 10
रवी कुमार एस यांची कारकीर्द दोन दशकांहून अधिक जुनी आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. २०१६ मध्ये ते इन्फोसिसमध्ये अध्यक्ष म्हणून रुजू झाले. बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
5 / 10
रवी कुमार गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कॉग्निजेंटमध्ये रुजू झाले. यापूर्वी त्यांनी प्राइसवॉटरहाऊस कूपर्स, ओरॅकल, सेपिएंट आणि केंब्रिज टेक्नॉलॉजी पार्टनर्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी न्यूयॉर्क ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आणि यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, ट्रान्सयुनियन, डिजिमार्क आणि इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमच् बोर्डातही काम केले.
6 / 10
रवी कुमार एस यांनी शिवाजी विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतातील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. GQ नुसार, रवी कुमार जेव्हा कॉग्निजेंटमध्ये सामील झाले तेव्हा त्यांना सुमारे ६ कोटी रुपयांचा बोनस मिळाला.
7 / 10
रवी कुमार यांचा वार्षिक पगार ७० लाख डॉलर (सुमारे ५७ कोटी रुपये) होता. २०२० मध्ये मुकेश अंबानींच्या पगारापेक्षा हे जवळपास चारपट जास्त आहे (१५ कोटी रुपये). एवढेच नाही तर रवी कुमार यांना एकवेळ उच्च पुरस्कार म्हणून ५० लाख डॉलर (अंदाजे ४१ कोटी रुपये) किमतीचे शेअर रिटर्न देखील मिळाले. मुकेश अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून पगार घेत नाहीत.
8 / 10
आयटी कंपनी कॉग्निजेंटने काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली होती. उमेदवार निवडीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उद्या म्हणजेच १४ ऑगस्ट ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र यात फ्रेशर्सना वार्षिक २.५० लाख पगार असल्याने सोशल मीडियात बहुतेक जणांनी नाराजी व्यक्त केली.
9 / 10
ही तर खूप मोठी रक्कम आहे, अभियांत्रिकी पदवीधर एवढ्या पैशात काय करणार अशी उपरोधिक टीका काही उमेदवारांनी केली तर दुसरा म्हणाला, व्वा, इतके पैसे? माझा ड्रायव्हर आठवड्यातून चार दिवस काम करून यापेक्षा जास्त पगार मिळवतो. त्यांचा पगार दोन लाख आहे.
10 / 10
मात्र, अशा मेसेजच्या गर्दीत जेव्हा प्रत्येकजण या नोकरीची आणि इथे मिळणाऱ्या पगाराची खिल्ली उडवत आहे तेव्हा काही युजर्स असे आहेत की, २० हजाराची असली तरी नोकरी आहे हे काही कमी नाही असं मत सोशल मीडियावर मांडत आहेत.
टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसाय