एक घर २५ कोटींचं, अशी हजारो बेचिराख! अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण आग, नेमकं किती नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:46 IST
1 / 6भल्याभल्या देशांना झुकायला लावणाऱ्या महासत्ता अमेरिकेने नैसर्गिक संकटापुढे अक्षरशः गुडघे टकेले आहेत. देशातील कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिसच्या जंगलात पेटलेल्या आगीकडे ज्वाळांकडे संपूर्ण जग पाहत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉस एंजेलिसमधील ही भीषण आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी आपत्ती ठरली आहे.2 / 6एचटीच्या अहवालानुसार, अमेरिकेतील या आगीच्या घटनेमुळे १३५ ते १५० अब्ज डॉलर्सचे (१,२९,७०,४४,९०,००,००० रुपये) नुकसान होऊ शकते, असा अंदाज खाजगी हवामानशास्त्र संस्था AccuWeather ने व्यक्त केला आहे.3 / 6अमेरिकेतील सर्वात मोठी बँक, जेपी मॉर्गन येथील विश्लेषकांचा अंदाज आहे की या आगीच्या घटनेमुळे विमा उतरवलेले नुकसान २० अब्ज डॉलर असेल. तर विमा नसलेले नुकसान १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. यानुसार, लॉस एंजेलिसची आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी आग ठरेल.4 / 6न्यूज एजन्सी एएफपीच्या म्हणण्यानुसार, २०१७ आणि २०१८ मध्ये झालेल्या आगीच्या घटनांपेक्षा सध्याची घटना अधिक भीषण आहे. यामध्ये १०,००० हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत, त्यापैकी बहुतेक घरे आहेत. ज्यांची किंमत सरासरी ३० लाख डॉलर्स (२५,९६,४४,९४४) आहे.5 / 6हवामान संबंधित आर्थिक जोखमींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सल्लागार कंपनीचे संस्थापक डेव्हिड बर्ट यांच्या अंदाजानुसार, पॅसिफिक पॅलिसेड्समधील एकूण १५,४०० मालमत्तांचे बाजार मूल्य अंदाजे १३.५ अब्ज डॉलर्स आहे. एवढ्या मोठ्या नुकसानीमुळे अमेरिकन विमा कंपन्यांवर दाव्याची मोठी जबाबदारी येणार आहे.6 / 6अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिसमध्ये गेल्या मंगळवारपासून आगीने आपले भयंकर रूप दाखवण्यास सुरुवात केली. जोराच्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिस ही अमेरिकेतील २ अतिशय सुंदर राज्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.