शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेल दर कपातीच्या निर्णयाचा मोदी सरकारला मोठा फटका; वाचा सरकारी तिजोरीचं किती नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 1:22 PM

1 / 10
मंगळवारी देशभरातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भाजपानं निकालाकडे गांभीर्याने पाहत आगामी काळात होणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखली आहे.
2 / 10
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी इंधन दरात एक्साइज शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल ५ रुपये तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करुन केंद्रानं नागरिकांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
3 / 10
केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल ६ रुपयांपासून १२ रुपयांपर्यंत आणि डिझेल ११ रुपयांपासून १७ रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहे. परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत १.४ लाख कोटींचे नुकसान सहन करावं लागणार आहे. तसेच चालू आर्थिक वर्षातही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 / 10
वृत्तसंस्था पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एक्साइज ड्युटीमध्ये कपात केल्यानंतर सरकारला मिळणाऱ्या महसूलात दर महिन्यात ८७०० कोटी रुपये घट होणार आहे. तर संपूर्ण १२ महिने म्हणजे १ वर्षात सरकारला जवळपास १ लाख कोटींचा फटका बसू शकतो. सध्याच्या आर्थिक वर्षात ४५ हजार कोटी कमी येऊ शकते.
5 / 10
विशेष म्हणजे एक्साइज ड्यूटी ही आतापर्यंतची सर्वाधिक कमी आहे. मागील वर्षी मे महिन्यात जेव्हा क्रूड ऑइलचे दर खूप कमी झाले होते. तेव्हा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या व्हॅटमध्ये क्रमश: १३ आणि १६ रुपयांची वाढ केली होती.
6 / 10
हा वाढीमुळे पेट्रोलवर ३२.९८ रुपये आणि डिझेलवर ३१.८३ रुपये कर आकारण्यात येत होता. परंतु आता पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये कमी केल्यानंतर आता हा कर क्रमश: पेट्रोलवर २७.९ रुपये आणि डिझेलवर २१.८ रुपये इतका करण्यात आला आहे.
7 / 10
केंद्राने कपात केल्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर १०३.९७ रुपये प्रति लीटर,डिझेल ८६.६७ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर दराने विक्री होईल. तर कोलकात्यात १ लीटर पेट्रोलसाठी १०४.६७ रुपये मोजावे लागत आहेत.
8 / 10
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील ७ रुपये कर कमी करेल. त्यामुळे गोव्यात डिझेलच्या किंमतीत १७ रुपये प्रति लीटर आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपये प्रति लीटर कपात होईल.कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर ७ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यात पेट्रोलचे दर ९५.५० आणि डिझेल ८१.५० रुपये प्रति लीटर असतील.
9 / 10
पेट्रोल डिझेलच्या दरात कमी केल्यानंतर शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला आहे. देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. मग ५० रुपयांनी पेट्रोल स्वस्त करायचं असेल तर आपल्याला आता संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
10 / 10
तर केंद्र सरकारने केलेली पेट्रोल-डिझेल दरातील कपात ही सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक नाही. सरकारने पेट्रोल ५० रुपयांनी कमी करायला हवं होतं. हे न जुळणारं गणित आहे, कारण आणखी काही दिवसांनी ते पेट्रोल-डिझेलचे दर वाढवतील असा टोला राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी लगावला आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल