lost pan card download e pan 5 minutes new website income tax department know the complete process
PAN Card हरवलंय?, नव्या वेबसाईटद्वारे 5 मिनिटांत डाऊनलोड करा e-PAN; पाहा संपूर्ण प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 5:45 PM1 / 10आधार कार्डाप्रमाणेच (Aadhaar Card) पॅन कार्ड हेदेखील महत्त्वाचं आहे. बँक खातं उघडणं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा अनेक गोष्टींसाठी पॅन कार्ड अतिशय आवश्यक असतं. 2 / 10परंतु जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा ते तुम्हाला सापडत नसेल तर तुम्हाला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही. 3 / 10तुम्ही सहजरित्या आपलं ई-पॅन कार्ड (e-Pan Card) इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकता.4 / 10सर्वप्रथम तुम्हाला incometax.gov.in या इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला Our Services वर क्लिक करावं लागेल.5 / 10त्यानंतर Instant E PAN वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या New E PAN या ऑप्शनवर क्लिक करा.6 / 10जर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर लक्षात नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर नियम अटी वाचून Accept वर क्लिक करा.7 / 10यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो त्या ठिकाणी टाका. सर्व माहितीची पडताळणी करून Confirm या ऑप्शनवर क्लिक करा. 8 / 10त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर पीडीएफ फॉर्मेटमध्ये पॅन कार्ज मिळेल. त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता. 9 / 10जर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक माहित नसेल तर तुम्हाला आधार कार्डानं पॅन डाऊनलोड करता येईल. परंतु यासाठी तुमंचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. 10 / 10जर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ई पॅन डाऊनलोड करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्यापूर्वी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications