lost you pan card here is how to download your e pan card online know process
अवघ्या दहा मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा काय आहे प्रोसिजर By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 4:18 PM1 / 11पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असतं. बँकेत अकाऊंट काढण्यासाठी, इनकम टॅक्स भरण्यासाठी, पैशाचे व्यवहार करण्सासाठी, लोन घेण्यासाठी, वाहन अथवा इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचं असतं.2 / 11मात्र अनेकदा काही कारणास्तव पॅन कार्ड हरवतं तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचं असतं. अशा मंडळीना अवघ्या दहा मिनिटांत आता पॅन कार्ड तयार करता येईल.3 / 11घरबसल्या काही मिनिटांत सोप्या पद्धतीने पॅन कार्ड काढणं आता शक्य झालं आहे. पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे.4 / 11फक्त १० मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येतं. मात्र ई-पॅन कार्डसाठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. ऑनलाईन ई-पॅन कार्ड कसं तयार करायचं जाणून घेऊया.5 / 11सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर Instant PAN through Aadhaar हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल.6 / 11नवं पेज ओपन झाल्यानंतर Get New PAN या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाका. कन्फर्म सेक्शनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.7 / 11फोनवर आलेला ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा. आयकर विभाग ही माहिती व्हेरिफाय करेल आणि दहा मिनिटांत तुम्हाला e-PAN मिळेल. जर तुम्हाला याची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्हाला यासाठी ५० रूपये शुल्क द्यावं लागेल.8 / 11ज्यांच्याकडे आधार क्रमांक असेल अशाच व्यक्तींना आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्वरितच एक पॅन क्रमांक दिला जाईल. रियल टाईम बेसिसवर हा पॅन क्रमांक देण्यात येईल.9 / 11ई पॅनसाठी तुम्हाला आधार बेस्ड केव्हायसी प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तसंच यानंतर अर्जदाराला PDF फॉर्मेटमध्ये पॅन कार्ड जारी केलं जाईल. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तरी तुम्हाला ते पुन्हा मिळवता येऊ शकतं.10 / 11पॅन कार्ड पुन्हा प्रिन्टसाठी तुम्हाला आधी https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या लिंकवर जावे लागेल. या लिंकवर जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात तुमचा पॅन नंबर (हरवलेला किंवा चोरीला गेलेला पॅन कार्ड नंबर), आधार कार्ड, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.11 / 11याचबरोबर, तुम्हाला तुमचे कार्ड घरी ऑर्डर करण्यासाठी काही फी देखील भरावी लागेल. यासाठी तुम्हाला https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homereprint या लिंकवर जावे लागेल. माहितीनुसार, जर तुम्हाला हे पॅन कार्ड भारतात मागवायचे असेल, तर तुम्हाला यासाठी 50 रुपये द्यावे लागतील आणि जर तुम्हाला ते देशाबाहेर मागवायचे असेल तर तुम्हाला यासाठी 959 रुपये द्यावे लागतील. आणखी वाचा Subscribe to Notifications