शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एलपीजी सिलिंडर बुकिंग आता फक्त तुमच्या आवाजाने करता येणार, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 6:36 PM

1 / 8
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) आपल्या ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर बुकिंग प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. आता गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईल फोनमध्ये इंटरनेट सुविधा लागणार नाही.
2 / 8
आता ग्राहक त्यांच्या आवाजानेच एलपीजी सिलिंडर बुक करू शकणार आहेत. गावातील दुर्गम भागात राहणाऱ्या आणि स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा नसलेल्या लोकांसाठी ही सुविधा गेम चेंजर ठरू शकेल.
3 / 8
विशेष म्हणजे आता भारत पेट्रोलियमचे ग्राहक सिलिंडर बुकिंगसाठी 'UPI123PAY' वापरून गॅस बुकिंगवर डिजिटल पेमेंट करू शकतीत आणि फक्त आपल्या आवाजाने गॅस सिलिंडर बुक करू शकतील.
4 / 8
कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही सुविधा सुरू केल्यानंतर, गावात राहणार्‍या 4 कोटींहून अधिक बीपीसीएल ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळेल.
5 / 8
दरम्यान, गेल्या आठवड्यातच केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशभरात UPI123PAY डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली. ही पेमेंट मोड सुविधा सुरू झाल्यापासून, देशातील 400 दशलक्ष फीचर फोन युजर्स आता डिजिटल पेमेंट मोडमध्ये सामील झाले आहेत.
6 / 8
ही डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केल्यापासून BPCL ही UPI123PAY शी टाय-अप करणारी पहिली कंपनी आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक 080-4516-3554 या नंबरवर कॉल करून त्यांचे गॅस सिलिंडर बुक करू शकतात.
7 / 8
याशिवाय, तुम्ही या नंबरद्वारे पैसे भरू शकता. यासोबतच RBI ने UPI123PAY सोबत 24*7 हेल्पलाइन डिजीसाथी (Digisathi) देखील सुरू केली आहे, ज्याच्या मदतीने लोक त्यांना पाहिजे तेव्हा डिजिटल पेमेंटमधील गैरसोय तपासून मदत मिळवू शकतात.
8 / 8
दरम्यान, ही सुविधा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ग्राहकांनी 1 कोटी व्यवहार केले आहेत. काही दिवसांत हा आकडा 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरbusinessव्यवसायReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक