शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LPG सिलिंडरदेखील होतात Expire; अशाप्रकारे तपासा तुमच्या सिलिंडरची एक्सपायरी डेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 7:59 PM

1 / 6
LPG Cylinder: भारतात LPG सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नवीन गॅस सिलिंडर खरेदी करताना बहुतांश लोक सिलिंडर व्यवस्थित तपासून घेतात. लिकेज होतीये का, गॅसचा वास येतोय का, हे तपासतात. याशिवाय अनेक वेळा नवीन सिलिंडरचे वजनही तपासले जाते. पण, सिलिंडरची एक्सपायरी डेट कुणीही पाहत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, LPG सिलेंडरची एक्सपायरी डेट असते का? याचे उत्तर आहे हो. ही एक्सपायरी डेट प्रत्येक सिलेंडरवर मोठ्या अक्षरात लिहिलेली असते.
2 / 6
पूर्वी अनेक घरात चुलीवर किंवा केरोसीनच्या स्टोव्हवर अन्न शिजवले जायचे. पण, आता बहुतांश घरांमध्ये गॅस सिलिंडर बसवण्यात आले आहेत. त्यातही काळानुरुप बरीच प्रगती झाली असून, आता अनेक घरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातो. म्हणजे सिलिंडरच्या त्रासातून तुमची सुटका झाली आहे. पण, अजूनही ही नवीन पद्धत सर्व घरांमध्ये उपलब्ध नाही. अजूनही अनेक घरात सिलिंडरचा वापर होतो.
3 / 6
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सिलिंडरची एक्सपायरी डेट कुठे लिहिलेली असते? सिलिंडरच्या वर जी उभी लोखंडी पट्टी आहे, त्यावर इंग्रजी अक्षर आणि अंक लिहिलेला असतो. हे कोडमध्ये लिहिलेले असते. यालाच त्या सिलिंडरची एक्स्पायरी डेट म्हणतात. जर तुमच्या गॅस सिलिंडरवर A-25 लिहिले असेल, तर याचा अर्थ हे सिलिंडर जानेवारी 2025 मध्ये संपेल. त्यावर लिहिलेली A ते D अक्षरे महिन्याची माहिती देतात आणि संख्या वर्षाची माहिती देते.
4 / 6
या कोडमध्ये ABCD प्रत्येकी तीन महिन्यांत विभागली आहे. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. त्याचप्रमाणे ब म्हणजे एप्रिल, मे आणि जून. त्याचप्रमाणे C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता जर तुमच्या सिलिंडरवर A-24 लिहिलेले असेल, तर त्याचा अर्थ तुमचा सिलिंडर 2024 मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान संपेल.
5 / 6
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलिंडरची एक्सपायरी डेट जाणून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, एक्सपायरी डेट का लिहिली जाते? तर, सिलिंडरवर लिहिलेल्या या तारखा टेस्टिंग डेट्स असतात. याचा अर्थ असा की, या तारखेला सिलिंडर चाचणीसाठी पाठवला जातो. सिलिंडर पुढील वापरासाठी योग्य आहे की नाही, हे पाहिले जाते. सिलिंडर तपासताना त्याची हायड्रो टेस्ट केली जाते. चाचणी दरम्यान मानकांची पूर्तता न करणारे सिलिंडर नष्ट केले जातात.
6 / 6
सिलिंडरचे आयुष्य किती असते?- साधारणपणे एलपीजी गॅस सिलिंडरचे आयुष्य 15 वर्षे असते. यादरम्यान सिलिंडर दोनदा चाचणीसाठी पाठवला जातो. पहिली चाचणी 10 वर्षांनी आणि दुसरी चाचणी 5 वर्षांनी केली जाते. आता तुम्हाला सिलिंडरच्या एक्सपायरीविषयी बरीच माहिती मिळाली असेल. तर, पुढच्यावेळी तुमच्या घरात आलेल्या सिलिंडरची एक्सपायरी तपासून घ्या.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सkitchen tipsकिचन टिप्सbusinessव्यवसाय