शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LPG Cylinder Price Hike : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पुन्हा एकदा कंपन्यांनी दिला 'जोर का झटका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 8:55 AM

1 / 7
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात १०४ रुपयांपर्यंतची वाढ केलीये. ही वाढ घरगुती सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली नसून ती कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे.
2 / 7
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढून २३५५ रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी १ एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर २६८.५० रुपयांनी वाढले होते.
3 / 7
कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती न वाढल्यानं सामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत विना अनुदानीत १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरचे दर ९४९.५० रुपये झाले आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर ९७६ रुपये आहेत.
4 / 7
मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत ९४९,५० रुपये आणि चेन्नईत ती ९६५.५ रुपये इतकी आहे. तर लखनौ आणि पाटण्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे ९८७.५० रुपये आणि १०३९.५० रुपये इतकी आहे.
5 / 7
इंडियन ऑईलनं आपल्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०४ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर कोलकात्यात १९ किलोच्या गॅस सिलिंडरचे दर १०४ रुपयांनी वाढून २४५५ रुपयांवर पोहोचले. यापूर्वी हे दर २३५१.५ रूपये होते. मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२ रुपयांनी वाढून २३०७ रुपये झाले. यापूर्वी मुंबईत कमर्शिअल गॅस सिलिंडर २२०५ रुपयांना मिळत होता. तर चेन्नईत हे दर १०२ रुपयांनी वाढून २५०८ रुपयांवर पोहोचले.
6 / 7
१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाहीत. परंतु जेट फ्युअलच्या दरात वाढ करण्यात आली. दिल्लीत एअर टरबाईन फ्युएलचे दर वाढून ११६८५१.४६ रुपये प्रति किलोलिटर झाली.
7 / 7
कोलकात्यात हे दर १२१४३०.४८ रूपये, मुंबईत ११५६१७.२४ रुपये आणि चेन्नईत हे दर १२०७२८.०३ रुपये प्रति किलोलिटर झाले. दिल्लीत एटीएफमध्ये ३६४९ रुपये प्रति किलोलिटरची वाढ झाली. कोलकात्यात ३६७७ रुपये आणि चेन्नईत ३७९५ रुपयांची वाढ झाली.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरMumbaiमुंबईdelhiदिल्ली