शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LPG ची किंमत ते ऑनलाइन मनी ट्रान्सफर...; अर्थसंकल्पापूर्वी देशात लागू झाले हे 4 मोठे बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:22 AM

1 / 6
देशाचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2024) संसदेत सादर केला जाणार आहे. हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. यामुळे सादर होणार हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. या अर्थसंकल्पात संसदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील. मात्र या घोषणा होण्यापूर्वीच देशात काही मोठे बदल लागू झाले आहेत. यात, काही बाबतीत लोकांना दिलासा मिळाला आहे, तर काही बाबतीत झटकाही बसला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत, ऑनलाइन मनी ट्रान्सफर, आदी बदलांचा यात समावेश आहे.
2 / 6
LPG सिलिंडर झाले महाग - अर्थसंकल्पाच्या दिवसीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. या नवीन दरानुसार, व्यावसायिक गॅसच्या दरात साधारणपणे १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
3 / 6
ताज्या बदलानुसार, आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, कोलकात्यात १८८७ रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये तर मुंबईत १७२३.५० रुपये इतका झाला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
4 / 6
IMPS मनी ट्रान्सफर झालं सोप - आज अर्थाता 1 फेब्रुवारी 2024 पासून झालेला दुसरा मोठा बदल ऑनलाइन मनी ट्रान्सफरशी संबंधित आहे. या अंतर्गत, आता वापरकर्ते केवळ प्राप्तकर्त्याचा मोबाइल नंबर आणि बँक खात्याचे नाव जोडून IMPS च्या माध्यमाने पैसे ट्रान्सफर करू शकतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, आता लाभार्थी आणि IFSC कोडची गरज भासणार नाही.
5 / 6
NPS विड्रॉलच्या नियमातही बदल - आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून झालेला तिसरा मोठा बदल म्हणजे, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणने (PFRDA) गेल्या 12 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आता घर खरेदी सोबतच, मेडिकल खर्च, शिक्षण, लग्न, आदींसाठी एनपीएसमधून पैसे काढता येतील.
6 / 6
फास्टॅग eKYC ची डेडलाइन वाढली - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) म्हटले होते की, केवाईसी नसलेले सर्व फास्‍टॅग 31 जानेवारीपासून निष्क्रिय करण्यात येतील. मात्र आता फास्टॅग केवायसी (Fastag KYC) अपडेट करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. यानुसार आता फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. आता फास्टॅगचे केवायसी २९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFastagफास्टॅगMONEYपैसा