शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घटस्फोटामुळे मिळालं जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान; 'तिची' एकूण संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 9:50 AM

1 / 6
World Richest Female mackenzie scott: लग्नसंस्था आणि घटस्फोटांच्या संख्येत होणारी वाढ हा सध्या चर्चेत असलेला मुद्दा आहे. तशातच एका प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नीला दिलेली पोटगीची रक्कम ही इतकी जास्त होती की त्यामुळे त्या महिलेला जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळाले.
2 / 6
त्या महिलेचे नाव मॅकेन्झी स्कॉट (Jeff Bezos Mackenzie Scott). ॲमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची ती पत्नी होती. स्कॉटने २०१९ मध्ये बेझोसला घटस्फोट दिला आणि तिला Amazon मध्ये चार टक्के स्टेक्स म्हणजेच १.९७ कोटी शेअर्स मिळाले.
3 / 6
गेल्या वर्षी तिने एकूण $10 अब्ज (सुमारे 83,121 कोटी रुपये) किमतीचे शेअर्स विकले. तिला ३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स मिळाले होते. यासह ती एका झटक्यात जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली.
4 / 6
१९९३ मध्ये बेझोस आणि स्कॉट यांचे लग्न झाले. १९९४ साली Amazon कंपनी सुरू झाली. कायद्यानुसार घटस्फोटानंतर मॅकेन्झीला बेझोसइतकीच संपत्ती मिळवण्याची संधी होती. वॉशिंग्टन कायद्यानुसार, लग्नानंतर मिळवलेली संपत्ती घटस्फोटाच्या वेळी पती-पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाते.
5 / 6
असे झाले असते तर आज स्कॉटकडे सुमारे $१८४ बिलियन झाले असते. पण चार टक्के भागभांडवल घेऊन बेझोसपासून ती वेगळी झाली. बेझोस हे १८४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
6 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या स्कॉटकडे एक आलिशान घर, भरपूर कार्स आहेत. तिने ॲमेझॉनचे करोडो शेअर्स विकले असले तरी अजूनही तिचा समावेश जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, स्कॉटची एकूण संपत्ती ३७.६ अब्ज डॉलर्स आहे आणि ती जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला आहे.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनDivorceघटस्फोटWomenमहिलाbusinessव्यवसाय