शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:31 AM

1 / 11
PPF maturity calculator: अनेकांचं कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असतं. म्हणून ते अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी शोधत असतात जिथे भरपूर नफा मिळतो. परंतु, गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न किती असेल आणि आयकराच्या कक्षेबाहेर ठेवायचं असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही चिंता दूर करतो.
2 / 11
या योजनेत गुंतवणुकीवर चांगला परतावा (PPF maturity calculator) आणि कर बचतीचे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग (Retirement Planning) करत असाल किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगली कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ही योजना निवडू शकता. पीपीएफच्या नावापेक्षा ही योजना अधिक लोकप्रिय आहे.
3 / 11
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सर्वात लोकप्रिय आहे कारण त्यात जमा केलेले पैसे, मिळालेलं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम (PPF Maturity Calculator) पूर्णपणे करमुक्त असते. म्हणजे ही स्कीम ईईई श्रेणीत ठेवण्यात आली आहे. EEE चा अर्थ म्हणजे Exempt. दरवर्षी ठेवींवर करसवलतीचा दावा करण्याचा पर्याय आहे. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागत नाही. खातं मॅच्युअर झाल्यानंतर संपूर्ण रक्कम करमुक्त होईल.
4 / 11
देशातील कोणताही नागरिक अल्पबचत योजना पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. हे पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत उघडता येते. गुंतवणुकीची किमान मर्यादा ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये प्रति आर्थिक वर्ष आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. मात्र, व्याजाचा निर्णय तिमाही आधारावर घेतला जातो.
5 / 11
सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा आहे. या योजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधा नाही. परंतु नॉमिनी केली जाऊ शकते. एचयूएफच्या नावानंही PPF Account उघडण्याचा पर्याय नाही. मुलांच्या बाबतीत पीपीएफ खात्यात पालकाचं नाव समाविष्ट केलं जातं. तथापि, हे केवळ वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत वैध आहे.
6 / 11
पीपीएफ ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये कोट्यधीश बनणं सोपं आहे. त्यासाठी नियमित गुंतवणुकीची गरज असते. समजा तुमचं वय २५ वर्षे आहे आणि तुम्ही पीपीएफ सुरू केले आहे. आर्थिक वर्षाच्या सुरवातीच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान खात्यात १,५०,००० रुपये (कमाल मर्यादा) जमा केल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला १०,६५० रुपये व्याज जमा होईल. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमची बॅलन्स १,६०,६५० रुपये असेल.
7 / 11
पुढील वर्षी पुन्हा तेच केल्यास खात्यात ३,१०,६५० रुपये शिल्लक राहतील. कारण, पुन्हा १,५०,००० रुपये जमा होतील आणि त्यानंतर संपूर्ण रकमेवर व्याज दिले जाईल. यावेळी व्याजाची रक्कम २२,०५६ रुपये असेल. कारण, इथे चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला चालतो. आता समजा पीपीएफ मॅच्युरिटीची १५ वर्षे पूर्ण झाली असतील तर तुमच्या खात्यात ४०,६८,२०९ रुपये असतील. एकूण अनामत रक्कम २२,५०,००० रुपये असेल आणि १८,१८,२०९ रुपये केवळ व्याजातून मिळतील.
8 / 11
समजा तुम्ही पीपीएफची सुरुवात वयाच्या २५ वर्षी केली. वयाच्या ४० व्या वर्षी म्हणजे १५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ४० लाखांहून अधिक रक्कम हातात असते. पण जर नियोजन दीर्घ काळासाठी असेल तर पैसे वेगाने वाढतील. पीपीएफमध्ये मॅच्युरिटीनंतर ५-५ वर्षांनी मुदत वाढवता येते. जर गुंतवणूकदारानं पीपीएफ खातं ५ वर्षांसाठी वाढवलं तर वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत एकूण रक्कम ६६,५८,२८८ रुपये होईल. यामध्ये ३०,००,००० रुपयांची गुंतवणूक होणार असून व्याजातून मिळणारं उत्पन्न ३६,५८,२८८ रुपये होईल.
9 / 11
कोट्यधीश होण्याचे ध्येय आता पूर्ण होऊ शकतं. पीपीएफ खात्याला पुन्हा एकदा म्हणजेच आणखी पाच वर्षांसाठी २५ वर्षांपर्यंत मुदतवाढ द्यावी लागणार आहे. पुन्हा तुम्हाला वर्षाला १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ५० व्या वर्षी पीपीएफ खात्यात एकूण १,०३,०८,०१४ रुपये जमा होतील. यामध्ये तुमची गुंतवणूक ३७,५०,००० रुपये आणि व्याज ६५,५८,०१५ रुपयांपर्यंत पोहोचेल.
10 / 11
पीपीएफचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही वेळा ५ वर्षांची मुदतवाढ देऊ शकता. आता पुन्हा एकदा खातं ५ वर्षांसाठी वाढवलं तर वयाच्या ५५ व्या वर्षी तुमच्याकडे १ कोटी ५४ लाख ५० हजार ९१० रुपये होतील. यामध्ये गुंतवणूक केवळ ४५,००,००० रुपये असेल, परंतु व्याजातून मिळणारे उत्पन्न १ कोटीच्या वर जाईल आणि एकूण कमाई १,०९,५०,९११ रुपये होईल.
11 / 11
जर तुम्ही निवृत्तीसाठी यात गुंतवणूक केली असेल तर पीपीएफ ला शेवटच्यांदा पुन्हा एकदा ५ वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी लागेल. म्हणजेच ही गुंतवणूक एकूण ३५ वर्षे सुरू राहणार आहे. अशावेळी मॅच्युरिटी वयाच्या ६० व्या वर्षी असेल. अशा परिस्थितीत पीपीएफ खात्यात एकूण जमा रक्कम २ कोटी २६ लाख ९७ हजार ८५७ रुपये असेल. यामध्ये एकूण गुंतवणूक ५२ लाख ५० हजार रुपये असेल, तर व्याजातून मिळणारं उत्पन्न १ कोटी ७४ लाख ४७ हजार ८५७ रुपये असेल. यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूकGovernmentसरकार