मजुरांचे अड्डे ओस, बेरोजगारांच्या हाताला काम; जेवणावळी फुल्ल, मंडप-खुर्च्यांना डिमांड By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 3:45 PM
1 / 8 राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं. प्रचारात रॅली, मेळावे, बैठका व सभांचं सत्र सुरू झालं. बांधकाम मजुरांच्या ठिय्यावर गर्दी कमी झाली आहे. मजूर आता कामावर कमी अन् प्रचारात जास्त दिसत आहेत. मतदारांपर्यंत निवडणुकीत पोहोचण्यासाठी उमेदवारांना बरीचशी कसरत करावी लागते 2 / 8 विधानसभा निवडणूक काळात अनेक हातांना काम मिळालं. यामध्ये मंडप व्यावसायिक, कैटरिंग, मजुरांचे ठेकेदार, खानावळी, बेरोजगार युवक, महिलांशिवाय मालवाहू-प्रवासी ऑटो यासह विविध प्रकारात कामे उपलब्ध झालेली आहेत. 3 / 8 येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तोपर्यंत हमखास रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे कामगार कामावर कमी अन् राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात जास्त व्यस्त असल्याचं दिसून येते. 4 / 8 यंदा दिवाळीपेक्षा निवडणुकीचा ज्वर लोकांमध्ये चांगलाच चढला आहे. सकाळपासून लोकं नवीन कपडे, गळ्यात दुपट्टा घालून, दुचाकीत पेट्रोल भरून घराबाहेर पडत आहेत. राजकीय पक्षाच्या बूथमध्ये दिवसभर बसल्याचं दिसून येत आहे. 5 / 8 फेटे, हार, बुकेची मागणी वाढली लक्ष्मीपूजनाला फुलांचे दर किलोला १५० रुपये होते. पण, फुलांचे दर निवडणुकीमुळे अजूनही कमी झाले नाहीत. शहराच्या काही ठिकाणी नाक्यावरून मजुरांना रॅली, सभांसाठी आमंत्रण दिले जाते. दोन वेळचे जेवण व मजुरीसुद्धा त्यांना मिळते. 6 / 8 दिवसभर उमेदवाराच्या मागे व रात्री शहराबाहेरील डाब्यांवर, खानावळीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवाराच्या प्रचाराचे भोंगे वस्त्या-वस्त्यांमध्ये वाजायला लागले आहेत. निवडणुकीमुळे वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. 7 / 8 मंडप, खुर्चीवाला खातोय भाव - मंडप : (१० बाय १० चा): २५०० रुपये दररोज - मंडप स्टेजसह (१० बाय १० चा)- २००० रुपये , खुर्चा (एक खुर्ची) : ५ रुपये , साऊंड सिस्टीम (ऑपरेटरसह): १५०० रुपये 8 / 8 मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचाराचे साहित्य पक्षाकडूनच पुरविले जाते. परंतु, अपक्ष उमेदवारांना ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, सायकल रिक्षा, डिझायनर्स, बॅनर, प्रिंटर्स स्टिकर, फ्रेम मेकर्स, पॉम्प्लेट, झेंडे बनवणारे यांच्यावर खर्च करावा लागतो. आणखी वाचा