शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ १० मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 3:59 PM

1 / 12
पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असतं. बँकेत अकाऊंट काढण्यासाठी, इनकम टॅक्स भरण्यासाठी, पैशाचे व्यवहार करण्सासाठी, लोन घेण्यासाठी, वाहन अथवा इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचं असतं.
2 / 12
मात्र अनेकदा काही कारणास्तव पॅन कार्ड हरवतं तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचं असतं. अशा मंडळीना अवघ्या दहा मिनिटांत आता पॅन कार्ड तयार करता येईल.
3 / 12
घरबसल्या काही मिनिटांत सोप्या पद्धतीने पॅन कार्ड काढणं आता शक्य झालं आहे. पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे.
4 / 12
फक्त १० मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येतं. मात्र ई-पॅन कार्डसाठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. ऑनलाईन ई-पॅन कार्ड कसं तयार करायचं जाणून घेऊया.
5 / 12
सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जा.
6 / 12
त्यानंतर Instant PAN through Aadhaar हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल.
7 / 12
नवं पेज ओपन झाल्यानंतर Get New PAN या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाका.
8 / 12
कन्फर्म सेक्शनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.
9 / 12
फोनवर आलेला ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा. आयकर विभाग ही माहिती व्हेरिफाय करेल आणि दहा मिनिटांत तुम्हाला e-PAN मिळेल. जर तुम्हाला याची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्हाला यासाठी ५० रूपये शुल्क द्यावं लागेल.
10 / 12
ज्यांच्याकडे आधार क्रमांक असेल अशाच व्यक्तींना आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
11 / 12
अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्वरितच एक पॅन क्रमांक दिला जाईल. रियल टाईम बेसिसवर हा पॅन क्रमांक देण्यात येईल.
12 / 12
ई पॅनसाठी तुम्हाला आधार बेस्ड केव्हायसी प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तसंच यानंतर अर्जदाराला PDF फॉर्मेटमध्ये पॅन कार्ड जारी केलं जाईल.
टॅग्स :Pan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्डIndiaभारतonlineऑनलाइनMobileमोबाइल