बापरे! 'या' व्यक्तीने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 15 ट्रिलियन गमावले; असं काय घडलं असेल? वाचा सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 11:28 PM
1 / 12 15 ट्रिलियन रुपये! ही रक्कम इतकी आहे की कोणत्याही व्यक्तीची पुढील अनेक पिढ्या आरामात बसून खाऊ शकतात, परंतु एका व्यक्तीने ही रक्कम केवळ दोन दिवसात गमावली आहे. दक्षिण कोरियाच्या एक ट्रेड एक्सपर्टच्या नुकसानीमुळे संपूर्ण मार्केट चिंतेत आहे. 2 / 12 57 वर्षीय ट्रेड एक्सपर्ट सुन्ग कुक ह्वांग यांनी अवघ्या दोन दिवसांत एवढी मोठी रक्कम गमावली आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांना हा पैसा गमावला. जर त्यांनी मार्चच्या सुरुवातीच्या काळात ही रक्कम काढून घेतली असती तर आज त्यांचे जगातील अव्वल श्रीमंत लोकांच्या यादीत नाव समाविष्ट झाले असते. 3 / 12 1982 मध्ये सुन्ग कुक ह्वांग हे दक्षिण कोरियाहून अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि त्यांनी स्वतःचे नाव बिलही ठेवले. ह्वांग यांनी लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी कार्नेगी मालोन विद्यापीठातून एमबीए केले होते. 4 / 12 ह्वांग हे आधी दोन सुरक्षा कंपन्यांचे सेल्समन होते. यानंतर 1996 मध्ये जेव्हा त्यांनी टायगर मॅनेजमेंट कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून काम करण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांना मोठा ब्रेक मिळाला होता. टायगर मॅनेजमेंटची स्थापना 1980 साली झाली होती. ही हेज फंड कंपनी होती. 5 / 12 2000 च्या सुरुवातीला ह्वांग यांनी आपली कंपनी टायगर एशिया मॅनेजमेंटची स्थापना केली. या कंपनीने आपले लक्ष आशियाई स्टॉक्सवर ठेवले. ह्वांग यांच्या हेज फंडचे काम प्रचंड सुरू होते, परंतु 13 वर्षांनंतर त्यांना आपल्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या. 6 / 12 खरंतर अमेरिकेच्या सिक्योरिटी रेग्युलेटर्सने ह्वांग यांच्याववर इनसाइडर ट्रेडिंगचा आरोप लावला होता. यामुळे त्यांचा हेज फंड व्यवसाय कोलमडला आणि 2013 मध्ये त्यांनी आर्केगोज ही कंपनी सुरू केली. 7 / 12 दरम्यान, आर्केगोजसोबत ह्वांग यांनी पुन्हा एकदा यशाच्या पायर्या चढण्यास सुरवात केली. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अॅमेझॉन, फेसबुक, लिंक्डइन आणि नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांना आल्या होत्या आणि ह्वांग यांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतल्यानंतर 100 अब्ज डॉलर्सचा जबरदस्त पोर्टफोलिओ तयार केला होता. 8 / 12 यामुळे, ह्वांग यांची एकूण मालमत्ता 20 अब्ज डॉलर्स होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ह्वांग हे 30 अब्ज डॉलर्सचे मालक होते. यावरून हे अनुमान काढता येईल की, नुकतेच जाहीर झालेल्या पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर होते, त्यांची मालमत्ता 84.5 अब्ज डॉलर्स आहे. 9 / 12 मात्र, ह्वांग यांच्यासाठी वाईट गोष्टी वाईट घडू लागल्या. 26 मार्च रोजी अशी बातमी आली की, आर्केगोजने कर्जामध्ये डिफॉल्ट केले आहे, ज्यामुळे कंपनी अब्ज डॉलर्सचा पोर्टफोलिओ बनवत होती. 10 / 12 ह्वांग यांनी 20 अब्ज डॉलर्स किंमतीचे व्हायाकॉमसीबीएस शेअर्स खरेदी केले. मात्र, जेव्हा मार्चच्या उत्तरार्धात व्हायाकॉमसीबीएसचे शेअर्स कोसळले तेव्हा बँकेने आर्केगोजकडून पैसे मागितले. ह्वांग यांची कंपनी आर्केगोज ही रक्कम देऊ शकली नाही, तेव्हा बँकेने त्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन विकली, ज्यामुळे ह्वांग यांनी 20 अब्ज डॉलर्स म्हणजे 15 ट्रिलियन रुपये गमावले. 11 / 12 बहुतेक अब्जाधीश लोक आपले पैसे व्यवसाय, रियल इस्टेट, स्पोर्ट्स टीम, आर्टवर्क आणि इतर गुंतवणूक करतात. तर ह्वांग यांच्या 20 अब्ज डॉलर्समधील बहुतेक पैसा लिक्विड पैसा होता आणि हे सर्व पैसे अवघ्या दोन दिवसातच गायब झाले. 12 / 12 आर्केगोजचे नुकसान हे मॉडर्न फायनान्शियल इतिहासाचे सर्वात ऐतिहासिक पतन असल्याचे म्हटले जाते. ब्लूमबर्ग वेबसाइटच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत इतक्या वेगाने पैशाचे नुकसान कोणत्याही व्यक्तीचे झाले नाही. आणखी वाचा