जगातील निम्म सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:48 IST
1 / 8ट्रम्प टॅरिफमुळे जगभरातील अर्थव्यवस्था अस्थिर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपले सोन्याचे भांडार वाढवत आहे. भारतही सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणत वाढवत आहे. परिणामी सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव आता लाखाच्या जवळ पोहचला आहे. पण, सोने एखाद्या देशाला बुडवू शकते, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?2 / 8इतिहासात अशी एक घटना घडली आहे. या देशाची अर्थव्यवस्था त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड सोन्याच्या साठ्यामुळे कोलमडली. हा देश रुळावर येण्यासाठी तब्बल १२ वर्षे लागली.3 / 8साल १३२४ मध्ये ही घटना इजिप्त या देशासोबत घडली. त्यावेळी इजिप्तवर माली साम्राज्याचा ९ वा शासक मानसा मुसा राज्य करत होता. या राज्याकडे त्यावेळी भरपूर संपत्ती होती. मुसा सन १३२४ मध्ये त्याचे ६० हजार लोक, १२ हजार गुलाम, ५०० घोडे आणि ८० उंटांसह प्रवासाला निघाला होता.4 / 8घोडे आणि उंट यांच्यावर भरभरुन सोने लादलेले होते. जेव्हा तो इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचला तेव्हा त्याने कैरोच्या लोकांना उदार हस्ते सोने वाटले. प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात सोने मिळाले. मग तो श्रीमंत असो वा गरीब. पण, सोन्याच्या या पुरामुळे तिथली अर्थव्यवस्था बुडाली.5 / 8लोकांकडे सोने आल्याने बहुतेकांनी काम करणे सोडून दिले. परिणामी उत्पादन बंद झाले. लोकांकडे सोने होते, पण खरेदी करण्यासाठी वस्तू नव्हत्या. अशा परिस्थितीत कैरोमध्ये महागाई गगनाला भिडली. देश मंदीत गेला, ज्यातून सावरण्यासाठी १२ वर्षे लागली.6 / 8ब्रिटिश संग्रहालयाच्या मते, त्यावेळी मालीमध्ये जगातील अर्धे सोने होते. मानसा मुसाने टिंबक्टूला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांची संपत्ती इतकी होती की आज त्याचा योग्य अंदाज लावणे कठीण आहे. 7 / 8१३७५ च्या कॅटलान अॅटलासमध्ये मालीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. यामध्ये मानसा मुसा सिंहासनावर बसलेला दाखवला आहे. त्याच्या एका हातात सोन्याचा गोळा आणि दुसऱ्या हातात सोन्याची काठी आहे. 8 / 8मुसाने २५ वर्षे मालीवर राज्य केले. इतिहासकार म्हणतात की त्याच्या संपत्तीचा अंदाज नाही.