शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१९ व्या वर्षी झालं लग्न, कॅमेऱ्यापासून राहतात दूर, कोण आहेत या ज्यांनी ₹११००००००० केले दान?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 8:54 AM

1 / 7
शिव नाडर, अझीम प्रेमजी आणि मुकेश अंबानी ही भारतातील उद्योग क्षेत्रातील परिचयाची नावं आहेत. देशातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींमध्येही त्यांच्या नावाचा समावेश होतो. परंतु यांच्याशिवायही एक जोडपं आहे जे हुरून इंडियाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सतत स्थान मिळवत आहे.
2 / 7
हे जोडपे म्हणजं सुष्मिता आणि सुब्रतो बागची. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलेंथ्रॉपिस्ट लिस्ट २०२३ (Edelgive Hurun India Philanthropist List 2023) नुसार, सुष्मिता आणि सुब्रतो बागची हे भारतातील सर्वात मोठ्या दानशूर लोकांमध्ये सहाव्या क्रमांकावर होते. त्यांनी गेल्या वर्षी ११०००००००० रुपयांहून अधिक दान केलं. ही रक्कम मोठी असली तरी सुष्मिता बागची यांनी गेल्या वर्षी दान केलेल्या २१३०००००००००० रुपयांपेक्षा ती कमी आहे. त्यांचं मोठं योगदान असूनही, सुष्मिता बागची प्रसिद्धीझोतापासून दूर राहणं पसंत करतात.
3 / 7
कटकमध्ये जन्मलेल्या सुष्मिता बागची या प्रसिद्ध ओरिया लेखिका शकुंतला पांडा यांच्या कन्या आहेत. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत, त्या केवळ एक प्रसिद्ध ओडिया लेखिका बनल्या नाहीत तर मासिक महिला प्रकाशन सुचरिताच्या क्रिएटरही आहेत.
4 / 7
राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केलं. सुष्मिता या अवघ्या पंधरा वर्षांच्या त्यांची सुब्रतो बागची यांच्याशी भेट झाली. अवघ्या चार चार वर्षांनंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
5 / 7
सुष्मिता यांच्या लेखन कौशल्याला त्यांच्या आईप्रमाणे पहिल्यांदाच मासिकात स्थान मिळालं. आईच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी साहित्यविश्वात प्रवेश केला. माइंडट्रीच्या सहसंस्थापक आणि समाजसुधारकाच्या भूमिकेसोबतच सुष्मिता बागची यांनी लेखिका म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांनी एक प्रवासवर्णन, अनेक लघुकथांचे संग्रह, तसंच इंग्रजी आणि उडिया भाषेत पाच कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
6 / 7
२०२२ मध्ये, सुष्मिता आणि सुब्रतो बागची, इतर माईंडट्री सह-संस्थापक, राधा आणि एनएस पार्थसारथी यांसारख्या समाजसेवी व्यक्तींनी आरोग्य सेवा क्षेत्राच्या प्रगतीसाठी एकूण २१३ कोटी रुपयांचं योगदान दिलं. या जोडप्यानं २०२३ मध्ये ११० कोटी रुपयांचं दान दिलंय.
7 / 7
बागची यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांना २०१० मध्ये अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आणि २०१३ मध्ये फोर्ब्स आशियातील ५० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी