शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Medicine: 1 एप्रिलपासून दरवाढ, पेनकिलरची किंमत ऐकूनच दुखू लागेल डोकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 1:09 PM

1 / 9
रोज होत असलेली इंधनदरवाढ आणि स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. अशातच आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक जवळपास ८०० औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढणार आहेत.
2 / 9
१ एप्रिलपासून लोकांना यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
3 / 9
जाणकारांच्या मते औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध सक्रिय घटकांच्या (एपीआय) किमती दोन वर्षात १५ टक्के ते १३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलची किंमत १३० टक्क्यांनी वाढली आहे.
4 / 9
औषधी गोळ्या तयार करण्यासाठी लागणारे परंतु स्वत:ला कोणताही औषधी गुणधर्म नसणारे सहायकांच्या (एक्सिपिअंट) किमती १८ ते २६२ टक्क्यांच्या दरम्यान वाढल्या आहेत.
5 / 9
द्रवरूप औषधे, सिरप, ओरल ड्रॉप्स आदी तयार करण्यासाठी ग्लिसरिन, प्रोपीलीन ग्लायकॉल तसेच त्यासाठी लागणारे सॉल्वंट्सच्या किमती ८३ टक्के ते २६३% वाढल्या आहेत.
6 / 9
औषधांमध्ये लागणाऱ्या इतर मध्यवर्ती घटकांच्या किमती ११ ते १७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. 'पेनिसिलिन जी'ची किंमत १७५ टक्क्यांनी वाढली आहे.
7 / 9
यामुळे देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती.
8 / 9
यामुळे देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती.
9 / 9
का होतेय भाववाढ? घाऊक महागाई दरात वाढ झाल्याने औषधांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. उत्पादन खर्चात खूप वाढ झाली आहे.
टॅग्स :medicineऔषधंhospitalहॉस्पिटलPetrolपेट्रोल