The method of check payment will change, new rules will come into force in the new year ...
चेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार... By बाळकृष्ण परब | Published: September 26, 2020 3:56 PM1 / 5भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक अफरातफर रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या १ जानेवारीपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरू करण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने केली आहे. 2 / 5पॉझिटिव्ह पे सिस्टिम अंतर्गत ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या चेकसाठी महत्त्वपूर्ण माहितीची दुसऱ्यांचा चाचपणी करणे आवश्यक असेल. या सिस्टिममध्ये चेक जारी करणाऱ्याला एसएमएस, मोबाईल अॅप आणि इंटरनेट बँकिंग किवा एटीएमसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकबाबत किमान माहिती द्यावी लागेल. 3 / 5यामध्ये तारीख, लाभार्थ्याचे नाव. चेक जारी करणाऱ्याचे नाव आणि रक्कम याबाबत माहिती द्यावी लागेल. या माहितीची चेक वठवण्यापूर्वी पडताळणी केली जाईल. त्यामध्ये जर काही विसंगती दिसून आली. तर त्याची माहिती देणारी बँक आणि चेक जारी करणाऱ्या बँकेला दिली जाईल. तसेच ही माहिती सुधारून घेण्यासाठीही प्रयत्न केले जातील. 4 / 5आरबीआयच्या म्हणण्यानुसार या सुविधेचा लाभ घेणे खातेधारकावर अवलंबून असेल. मात्र बँक पाच लाख रुपये आणि त्यावरच्या रकमेसाठी ही व्यवस्था अनिवार्यपणे लागू करू शकते. ही प्रणाली १ जानेवारी २०२१ पासून लागू होईल, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. 5 / 5बँकेने याबाबत आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे जागरूक करण्यास सांगितले आहे. तसेच बँकांनी आपल्या शाखा, एटीएमसोबत आपली संकेतस्थळे आणि इंटरनेट बँकींगच्या माध्यमातूनही याची माहिती देण्यास सांगितले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications