शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लहान मुलांसाठीही घेता येऊ शकतो पोस्टाच्या 'या' स्कीमचा लाभ; १००० रूपयांपासून करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 12:29 PM

1 / 15
सध्या अनेक योजनांवरील व्याजदर कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे नियमित उत्पान्नाचे पर्याय कमी झाले आहेत.
2 / 15
परंतु सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पर्याय उपलब्ध आहेत जे बँकांच्या तुलनेत उत्तम रिटर्न्स देऊ शकतात. त्यापैकीच एक म्हणजे मासिक उत्पन्न योजना. याची विशेष बाब म्हणजे या योजनेची सुरूवात केवळ १ हजार रूपयांपासून करू शकता.
3 / 15
सध्याच्या काळात यावर ६.६ टक्क्यांचं व्याजदर मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावरही या योजनेअंतर्गत खातं सुरू करू शकता. १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांचं यात खातं सुरू करू शकता.
4 / 15
सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सलग दुसऱ्या तिमाहिमध्ये छोट्या बचत योजनांच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
5 / 15
तुम्हाला किमान १००० रूपयांची गुंतवणूक करून पोस्ट ऑफिसच्या स्कीमची सुरूवात करता येऊ शकते. एखादी व्यक्ती यामध्ये जास्तीतजास्त साडेचार लाख रूपयांची गुंतवणूक करू शकेल.
6 / 15
परंतु या स्कीममध्ये जर तुम्ही जॉईंट खातं सुरू केलं तर तुम्ही यामध्ये ९ लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
7 / 15
जेव्हा कोणतीही व्यक्ती स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असते, त्यावेळी सर्वप्रथम ती व्यक्ती यावर जेव्हा कोणतीही व्यक्ती स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची तयारी करत असते, त्यावेळी सर्वप्रथम ती व्यक्ती यावर व्याज किती मिळेल, याची माहिती तपासत असते.
8 / 15
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये ग्राहकांना ६.६ टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. जर तुम्ही दर महिन्याला मिळणारं व्याज काढलं नाही, तर तुम्हाला त्या व्याजावर अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
9 / 15
यामध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करताना यामधून व्याजाद्वारे होणारी कमाई ही कराच्या कक्षेत येते.
10 / 15
ही स्कीम पाच वर्षांसाठी सुरू केली जाते. परंतु काही अटींसह ही स्कीम एका वर्षातही बंद करता येऊ शकते.
11 / 15
जर एखाद्या व्यक्तीनं ही स्कीम एका वर्षानंतर आणि ३ वर्षांच्यापूर्वी बंद केली तर त्या व्यक्तीला प्रिन्सिपल अमाऊंटमधून २ टक्के रक्कम कापून दिली जाते.
12 / 15
जर एखाद्या व्यक्तीनं तीन वर्ष ते पाच वर्षांच्या दरम्यान आपला अकाऊंट बंद केला, तर त्या व्यक्तीला प्रिन्सिपल अमाऊंटमधून एक टक्का रक्कम कापून दिली जाते.
13 / 15
परंतु जर ही स्कीम घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत त्यांच्या नॉमिनीला पैसे दिले जातात. यासाठी आपलं खातं सुरू करताना नॉमिनी लिहिणं आवश्यक आहे.
14 / 15
दरम्यान, खातं उघडताना काही अटींचं पालन करावं लागेल. संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणं आवश्यक आहे.
15 / 15
तसंच कोणतीही परदेशातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. याशिवाय त्या व्यक्तीचं वय १० वर्षांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसाInvestmentगुंतवणूक