Mithun Sacheti Success Story: 17000 crore business sold to TATA; Who is Mithun Sancheti, Know
एका झटक्यात 17000 कोटींचा व्यवसाय TATA ला विकला; कोण आहे मिथुन संचेती, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 4:33 PM1 / 6 Mithun Sacheti Success Story: तीन महिन्यांपूर्वी TATA समूहाच्या टायटन कंपनीने कॅरेटलेन ज्वेलरी ब्रँडचा संपूर्ण हिस्सा खरेदी केला. कॅरेटलेन आता टाटा समूहाची कंपनी बनली आहे. पण, याच कॅरेटलेनची सुरुवात कोणी आणि कशी केली, हे तुम्हाला माहित आहे का? ही यशोगाथा तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कॅरेटलेनचे सीईओ मिथुन संचेती (Mithun Sacheti) यांनी अमेरिकेतून रत्नशास्त्राचा अभ्यास केला आणि आपला कौटुंबिक व्यवसाय 'जयपूर जेम्स'ची जबाबदारी आपल्या हाती घेतली. जयपूर जेम्सची सुरुवात त्यांच्या वडिलांनी 1974 मध्ये केली होती. या दुकानाच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचा मुंबईतील 3,000 हून अधिक कुटुंबांचा ग्राहकवर्ग होता.2 / 6 मिथुन या व्यवसायावर खूश नव्हते. त्यांचे पारंपारिक दुकान होते, पण ऑनलाइन स्टोअर नव्हते. मिथुनला हा व्यवसाय पुढे न्यायचा होता. यासाठी त्यांनी वडिलांकडून 75 लाख रुपये आणि चार वर्षांचा वेळ मागितला. 2008 मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना 75 लाख रुपये दिले आणि त्यांनी कॅरेटलेन कंपनीची सुरुवात केली. त्यांनी कंपनीची वेबसाइट तयार केली, पण पहिल्या 15 दिवसात त्यांना कुठलीच ऑर्डर मिळाली नाही. लोक त्यांच्यावर हसायला लागले आणि कोणीही त्यांच्याबरोबर गुंतवणूक करायला तयार नव्हते. नंतर त्यांनी स्वतः यात गुंतवणूक वाढवली, पण दुर्दैवाने त्यांना 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले.3 / 6 संचेती यांनी आपल्या व्यवसायाला नवे रूप देण्याचा विचार सुरू केला. पण इतक्यात त्यांना एक मेसेज आला. टायगर ग्लोबलचे पार्टनर ली फिक्सेल यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मीटिंगच्या 50 मिनिटांनंतर मिथुनला कॅरेटलेनच्या 33% वर 27 कोटी रुपयांचे टर्म शीट मिळाले. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि कंपनीच्या मार्केटिंगवर 4 कोटी रुपये खर्च केले.4 / 6 वेबसाइट सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बंद करण्यात आली. यानंतर त्यांनी दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये पहिले फिजिकल स्टोअर उघडले. त्याची कल्पना साधी होती. त्यांनी मोठ्या मार्जिनसह उच्च दर्जाचे हिऱ्याचे दागिने विकले. त्यांच्या व्यवसायाची कल्पना कामी आली आणि कॅरेटलेनचा महसूल 300% वाढला. 2013 मध्ये कॅरेटलेन ही 100 कोटी रुपयांची कंपनी बनली. टायगर ग्लोबलने यात आणखी गुंतवणूक केली. 2012 मध्ये 30 कोटी रुपये आणि 2013 मध्ये 45 कोटी रुपये गुंतवले. 5 / 6 दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे दुकाने सुरू केली. 2014 पर्यंत कॅरेटलेनचे देशभरात 12 स्टोअर होते आणि वार्षिक विक्री 300 कोटी रुपयांपर्यंत वाढली. व्यवसाय वाढत असल्याचे पाहून टायगर ग्लोबलने 180 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली. ब्लूस्टोन आणि मेलोरासारखे ऑनलाइन प्लेयर्स आल्यानंतर मिथुनने ऑफलाइन भागीदारीवर भर दिला. इथे त्यांना तनिष्कच्या टायटनची साथ मिळाली. काही दिवसांनंतर मोठी बातमी आली आणि जुलै 2016 मध्ये टायटनने कॅरेटलेनचे 62% शेअर्स विकत घेतले. यामुळे टायगर ग्लोबलला 357 कोटी रुपयांची गुंतवणूक परत मिळाली.6 / 6 130 स्टोअर उघडले. यावर्षी कंपनीने 621 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. एवढेच नाही तर 12 वर्षांत कॅरेटलेनला फायदा झाला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या विक्रीतून कॅरेटलेनला 2000 कोटी रुपयांची कमाई असलेली कंपनी बनण्यास मदत झाली. संधी पाहून टायटनने मिथुन यांचा 27.18% स्टेक 17 हजार कोटींच्या व्हॅल्यूएशनवर 4621 कोटींना विकत घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications