Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 2:23 PM
1 / 18 स्थानिक लॉकडाऊन, सेमीकंडक्टर्सची टंचाई आणि कारखान्यातील कामगारांमधील कोरोना संक्रमणामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये स्मार्टफोन फोन उत्पादन आणि विक्रीत मोठी घट झाली आहे. 2 / 18 यामुळे एप्रिल ते जून हा तिमाही या कंपन्यांसाठी आव्हानात्मक झाला आहे. अनेक मोबाइल फोन कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत सांगितलं. 3 / 18 तसंच लावा इंटरनॅशनलचे सह-संस्थापक एस.एन. राय आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल यांनी कबूल केलं की देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना एप्रिल-मे महिन्यामध्ये स्मार्टफोनच्या उत्पादनामध्ये जवळपास ५ टक्क्यांनी घट झाली आहे. 4 / 18 'जूनच्या तिमाहीत परिस्थिती खरोखरच आव्हानात्मक आहे,' असं राय यांनी नमूद केलं. 5 / 18 आमच्यासारख्या काही कंपन्या एप्रिलमध्ये उत्पादन सुरू ठेवू शकल्या कारण आमच्याकडे स्पेअर पार्ट्सचा काहीसा साठा होता. परंतु सर्व कंपन्यांमध्ये असे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 6 / 18 मे महिन्यात संक्रमणाची वाढ झाल्यानं आणि लॉकडाऊन लागल्यामुळे सर्वांसाठी वाईट झाला होता. उद्योगाबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात जवळपास ५ टक्के तोटा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. 7 / 18 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्रकल्पातही आयफोनचं उत्पादन कंपनीनं ५० टक्क्यांनी कमी केल्याचं रॉयटर्सनं आज सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. 8 / 18 फॉक्सकॉन ही कंपनी भारतात अॅपल आयफोनचं उत्पादन करते. तसंच ही कंपनी शाओमीसाठीही स्मार्टफोन निर्मितीचं काम करते. 9 / 18 रिसर्च फर्म आयडीसीच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या दुसर्या पंधरवड्यात स्मार्टफोनची खेप कमी होऊ लागली. 10 / 18 पण कंपन्यांनी सांगितलं की मार्च तिमाही त्यांच्यासाठी चांगली होता. परंतु गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्री कमी झाल्यामुळेही हे झालं होतं. 11 / 18 आयडीसीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान स्मार्टफोन कंपन्यांकडून डिसेंबर तिमाहीत १४ टक्के कमी स्मार्टफोन आले. 12 / 18 परंतु गेल्या वर्षी जानेवारी-मार्चच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून तिमाहीत उत्पादन कमी होईल असंही कंपन्यांचं म्हणणं आहे. 13 / 18 सध्या परिस्थिती आव्हानात्मक असल्यामुळे जून तिमाही कंपन्यांसाठी कठीण होणार आहे, असं मायक्रोमॅक्सचे अग्रवाल म्हणाले. 14 / 18 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खरेदीदारांनीही याकडे पाठ फिरवली आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं. 15 / 18 २०२१ या कॅलेंडर वर्षात पूर्वीच्या अपेक्षेइतके सुधारणा होणार नाही. दुसर्या लाटेचा प्रभाव आणि तिसर्या लाटाचा भय बराच काळ टिकू शकेल, असं आयडीसी इंडियाचे संशोधन विभागाचे संचालक नवकेंद्र सिंग म्हणाले. 16 / 18 २०२१ मध्ये स्मार्टफोन बाजाराची वार्षिक वाढ एकाच अंकात होईल. पहिल्यांदा दोन अंकात ही वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं. 17 / 18 अनावश्यक खर्च कमी करणे, पुरवठा साखळीवरील दबाव आणि भागांच्या किंमतीत वाढ होणे अपेक्षित असून त्यामुळे येणाऱ्या तिमाहींमध्ये दबाव वाढू शकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 18 / 18 लॉकडाऊन हटवल्यानंतर दोन तीन आठवडेही उत्साह कमीचं असेल. परंतु उत्पादन सुरू होऊ शकतं. परंतु उत्तम सुधारणांसाठी कागी महिने प्रतीक्षा करावी लागू शकते, असंही सिंग म्हणाले. आणखी वाचा