modi govt notifies new drone rules zen technologies dcm shriram industries stocks investment money
मोदी सरकारच्या ड्रोन नियमांच्या बदलाचा दोन कंपन्यांना झाला फायदा; गुंतवणूकदारही झाले मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 6:43 PM1 / 10मोदी सरकारने देशासाठी नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं आहे. नागरी उड्डयन मंत्रालयानं शासकीय संस्था आणि सामान्य लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर नवी नियमावली समोर ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे ड्रोन धोरण म्हणजे देशासाठी मैलाचा दगड ठरेल, असं म्हणाले होते.2 / 10नव्या ड्रोन नियमांमुळे स्टार्टअप्सला तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईलाही चांगली उभारी मिळेल. यामुळे नवनिर्माणाच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याशिवाय भारताला अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि नवनिर्माण क्षेत्रामध्ये आणखी बळकटी मिळेल. भारत ड्रोन हब म्हणून ओळखला जाईल, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. 3 / 10दरम्यान, केंद्रानं ड्रोन नियम अधिक सोपे केल्याचा फायदा दोन कंपन्यांना झाला आहे. शेअर बाजारात झेन टेक्नॉलॉजी आणि डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळाला आहे. या दोन्ही कंपन्या ड्रोन व्यवसायात आहेत. याच कारणामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफाही झाला आहे.4 / 10झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल बोलायचं झालं तर शुक्रवारी कंपनीच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांनी वाढून १०० रुपयांच्या पुढे गेली. शेअरची किंमत १०७.७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. कंपनीचे बाजार भांडवल ८१० कोटी रुपये आहे. 5 / 10DCM श्रीराम इंडस्ट्रीजबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअर्समध्ये चढ -उतार दिसून येत होता. कंपनीच्या शेअरची किंमत ४१५ रुपयांच्या पातळीवर आहे. बाजार भांडवलाबद्दल बोलायचं झाले तर ते ७२० कोटी रूपये आहे.6 / 10स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांच्या मते, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी आहे. कंपनीसाठी नवीन ड्रोन नियम भविष्यासाठी चांगले असू शकतात. त्याच वेळी, अलीकडेच DCM श्रीराम इंडस्ट्रीजने तुर्की UAV निर्माता आणि ड्रोन उत्पादक Zyrone Dynamics सोबत करार केला आहे. नवीन नियमांच्या दृष्टीने कंपनीचे भवितव्य चांगले असेल अशी अपेक्षा आहे.7 / 10नव्या नियमात आता ५०० किलोपर्यंत वजन उचलणाऱ्या ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ही मर्यादा ३०० किलोपर्यंत मर्यादित होती. या माध्यमातून ड्रोन टॅक्सीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं ध्येय असल्याचे सांगितलं जात आहे. 8 / 10तसंच ड्रोनसाठी यापूर्वी २५ नियम पाळावे लागत होते. आता ही संख्या ५ वर आणण्यात आली आहे. ड्रोनसाठी नोंदणी किंवा परवाना मिळवण्यासाठी यापुढे सुरक्षा संस्थांच्या मंजुरीची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे मंजुरीसाठी शुल्क देखील केवळ नाममात्र करण्यात आलं आहे. 9 / 10ड्रोनच्या उड्डाणाचा मार्ग निश्चित करण्यासाठी ‘डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म’ तयार करण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये ग्रीन, येल्लो आणि रेड झोन तयार केले जातील. यावर सर्व ड्रोनची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असणार आहे. 10 / 10विमानतळावरून उच्च उंचीवर ड्रोन उडवण्यासाठी मंजुरीची आवश्यकता कायम असणार आहे. ग्रीन झोनमध्ये ड्रोन उडवण्यासाठी कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही. ड्रोन नियम २०२१ अंतर्गत कोणताही नियम मोडल्यास जास्तीत जास्त दंड १ लाख रुपयांपर्यंत आहे. तथापि, उर्वरित क्षेत्राचे नियम मोडल्यास नवीन ड्रोन नियमांपेक्षा वेगळा दंड होऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications