शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ITR Refund : आयटीआर रिफंड करुनही पैसे आले नाहीत, पाच मिनिटात 'हे' काम करा, लगेच पैसे जमा होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 3:54 PM

1 / 8
जुलै महिन्यात अनेकांची आयटीआर फाईल रिटर्न करण्यासाठी गडबड सुरू असते. काहींना आयटीआर परतावा मिळतो.अनेकदा आपण आयटीआऱ फाईल वेळेत भरुनही आपल्याला परताव्याची रक्कम वेळेत मिळत नाही.
2 / 8
आयकर परतावा मिळविण्यासाठी अनेक घटक कार्यरत असतात. यापैकी कोणत्याही एका घटकामध्ये डिफॉल्ट असल्यास, ITR परतावा मिळण्यास वेळ होऊ शकतो.
3 / 8
जर तुमचाही परतावा वेळेत मिळाला नसेल तर आयटीआर विभागाने काही पर्याय दिले आहेत. ते केल्यास तुमची रक्कम लगेच मिळू शकते.
4 / 8
तुमची इन्कम टॅक्स रिफंड प्रक्रिया बराच काळ अडकली असल्यास, तुम्ही रिफंड-री-इश्यू दाखल करा. यानंतरही कर परताव्याची रक्कम न मिळाल्यास विभागाकडे तक्रार करू शकता.
5 / 8
जर तुम्ही आधीच कराची रक्कम जमा केली असेल आणि ती रक्कम कर दायित्वापेक्षा जास्त असेल तरच आयकर विभाग तुम्हाला कर परत करु शकते. या कर दायित्वाची गणना प्राप्तिकर विभागाद्वारे मूल्यांकनाच्या वेळी अनुमती दिलेल्या सर्व वजावट आणि सूट लक्षात घेऊन केली जाते.
6 / 8
तुम्ही आजच तुमचा आयकर भरला आणि एक-दोन दिवसांत तुमचा कर परतावा मिळेल, असे होत नाही. आयटीआर रिफंड यायला थोडा वेळ लागतो आणि काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आयकर परतावा मिळविण्यासाठी, तुमचा आयटीआर व्हेरिफाय करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला परतावा मिळेल.
7 / 8
आयकर रिटर्नची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे ४ ते ५ आठवड्यांत आयटीआर रिफंड करदात्यांच्या बँक खात्यात येतो.
8 / 8
तुम्हाला तुमचा परतावा ४ ते ५ आठवड्यांच्या आत न मिळाल्यास, तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे कारवाई करु शकता. घाईघाईत आयटीआर भरताना अनेकदा चुका करतात, त्यामुळे टॅक्स रिफंड मिळत नाही.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सTaxकर