Money: Doing FD? Then remember these things, otherwise there will be loss
Money: एफडी करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 6:39 AM1 / 6अलीकडेच अनेक बँकांनी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवले आहेत. अनेक वेळा लोक फक्त व्याजदर पाहून एफडी करून घेतात, पण असे करणे योग्य नाही. एफडी करण्यापूर्वी कालावधी, त्यात गुंतवणुकीवर उपलब्ध कर सूट यासह अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एफडी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच एफडीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.2 / 6एफडी करताना त्याचा कालावधी ठरवताना काळजीपूर्वक विचार करा, कारण मुदतपूर्तीपूर्वी रक्कम काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. एफडी परिपक्व होण्याआधी तोडल्याबद्दल १% पर्यंत दंड भरावा लागेल. यामुळे ठेवीवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते. म्हणूनच जास्त व्याजाच्या लोभापोटी दीर्घकालीन एफडी करणे टाळवे.3 / 6जर तुम्ही एकाच बँकेत १० लाख रुपये एफडीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर थांबा. अशावेळी १ लाख रुपयांच्या ९ एफडी आणि ५० हजार रुपयांच्या २ एफडी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कराव्यात. यामुळे तुम्हाला मध्येच पैशांची गरज भासल्यास तुम्ही तुमच्या गरजेनुसार मध्येच एफडी मोडून पैशांची व्यवस्था करू शकता. अशावेळी तुमच्या उर्वरित एफडी सुरक्षित राहतील.4 / 6यापूर्वी बँकेत त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता, आता काही बँकांमध्ये मासिक पैसे काढता येतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते निवडू शकता.5 / 6तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज देखील घेऊ शकता. तुम्ही एफडीच्या एकूण ९०% पर्यंत कर्ज घेऊ शकता. समजा तुमच्या एफडीचे मूल्य १.५ लाख रुपये असेल तर तुम्हाला १ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. तुम्ही एफडीवर कर्ज घेतल्यास, तुम्हाला एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा १-२% जास्त व्याज द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या एफडीवर ६% व्याज मिळत असेल तर तुम्हाला ७ ते ८% व्याजदराने कर्ज मिळू शकते.6 / 6बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ०.५०% जास्त व्याज देतात. अशा परिस्थितीत, जर घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या नावावर एफडी करून तुम्ही जास्त नफा कमवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications