शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock : दीड महिन्यांत दुप्पट झाले पैसे; 'या' सरकारी कंपनीच्या शेअरनं केली गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 3:52 PM

1 / 9
Multibagger Stock : एका सरकारी कंपनीने (Government Company) यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार रिटर्न्स दिले आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीड महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.
2 / 9
या सरकारी कंपनीचं नाव गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GMDC) आहे. कंपनी खनिज आणि लिग्नाइट खाण व्यवसायात कार्यरत असून या कंपनीचे मार्केट कॅप 4,500 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
3 / 9
ही कंपनी गुजरात सरकारच्या (Gujrat Government) मालकीची असून कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 151.95 रुपये इतका आहे. गेल्या दीड महिन्यांच्याच कालावधीत कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.
4 / 9
गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GMDC) चे शेअर्स 3 जानेवारी 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 73.75 रुपये होते. 16 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 142.25 रुपयांवर बंद झाले.
5 / 9
या दीड महिन्यात कंपनीच्या शेअर्सनं सुमारे 93 टक्के परतावा दिला आहे. ही कंपनी १९९९ मध्ये शेअर बाजारावर लिस्ट झाली होती.
6 / 9
जर एखाद्या व्यक्तीने या वर्षी 3 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर १६ फेब्रुवारीच्या मूल्यानुसार हे पैसे सुमारे 1.93 लाख रुपये झाले असते.
7 / 9
म्हणजेच दीड महिन्यात गुंतवलेले पैसे जवळपास दुप्पट झाले असते. परंतु गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये 2.14 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर 139.50 रुपयांवर बंद झाले.
8 / 9
22 सप्टेंबर 2000 रोजी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स BSE वर 3 रुपयांच्या पातळीवर होते. 16 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 142.25 रुपयांवर बंद झाले.
9 / 9
जर एखाद्या व्यक्तीने 22 सप्टेंबर 2000 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर या पैशाचे सध्याचे मूल्य 47.41 लाख रुपये झाले असते. GMDC समभागांचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 52 रुपये आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकGovernmentसरकार