money making tips axis bank fd rates hikes-by 5 bps on multiple tenors effective from 21 april
Axis बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! 'या' योजनेचे वाढवले दर, खातेधारक होणार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 8:13 PM1 / 9खासगी क्षेत्रातील अॅक्सिस (Axis Bank) बँकेने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी दरांमध्ये ५ बेसिस पॉइंट्स (BPS) वाढ केली आहे.2 / 9बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर २१ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. अॅक्सिस (Axis) बँकेच्या ऑनलाइन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान ५,००० रुपये जमा करावे लागतील.3 / 9अॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ३.५० टक्के ते ७ टक्के व्याज देत आहे.4 / 9बँक २ वर्ष ते ३० महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर सर्वाधिक ७.२० टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ७.९५ टक्के दराने व्याज मिळेल.5 / 9७ दिवस ते ४५ दिवसांतील एफडीवर ३.५० टक्के व्याजदर दिले जातील. बँक ४६ दिवस ते ६० दिवसात मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ४% व्याज देईल. ६१ दिवस ते ३ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ४.५० टक्के व्याजदर दिला जाईल. 6 / 9आता ३ महिने ते ६ महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.७५ टक्के व्याजदर दिला जाईल. 7 / 9अॅक्सिस बँक ६ महिने ते ९ महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ५.७५ टक्के व्याजदर देईल. ९ महिने ते १ वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ६% व्याजदर उपलब्ध असेल.8 / 9रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 9 / 9रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी RBI ने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २.५० टक्क्यांनी वाढ केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications