शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SIP Mutual Fund Investment :केवळ ७ वर्षांत ४ पटींपेक्षाही अधिक झाला पैसा; 'या' फंडांनी केलाय गुंतवणूकदारांवर धनवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 9:13 AM

1 / 8
SIP Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. आजकाल अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये जोखीम जरी अधिक असली तरी मिळणारा परतावा हा अधिक असल्यामुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड एसआयपीला प्राधान्य देताना दिसतात.
2 / 8
सर्वसामान्य गुंतवणूकदार केवळ मोठ्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ म्युच्युअल फंड स्कीम्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात एसआयपीनं गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलंय. या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ७ वर्षांत ४ पटीनं वाढली आहे. विशेष म्हणजे या ५ स्कीम्समध्ये ३ स्मॉल कॅप फंड आहेत, प्रत्येकी एक मिड कॅप आणि ईएलएसएस फंड आहे.
3 / 8
एचएसबीसी स्मॉल कॅप फंड - एचएसबीसी स्मॉल कॅप फंडातील ७ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला होता. एसआयपीतील गुंतवणूकीचा पैसा २३.०८ XIRR आतापर्यंत ३.३८ टक्के झालाय. जर ७ वर्षांपूर्वी दर महिन्याला तुम्ही यात १० हजारांची एसआयपी केली असती तर आज याचं मूल्य २८,१४,००० रुपये झाल असतं.
4 / 8
क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड - क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडात ७ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एसआयपीच्या गुंतवणुकीनं आतापर्यंत २३.२२ टक्के XIRR सह ३.४१ पटीनं वाढ झाली आहे. या योजनेत ७ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या १०,००० रुपयांच्या एसआयपीचं एकूण मूल्य आज २८,६४,४०० रुपये झालं आहे.
5 / 8
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड - मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडात ७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआयपी गुंतवणुकीचा पैसा आतापर्यंत २४.५१ टक्के XIRRसह ३.६५ पटीनं वाढला आहे. या योजनेत ७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०,००० रुपयांच्या एसआयपीचं एकूण मूल्य आज ३०,६६,००० रुपये झाले आहे.
6 / 8
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड - निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडात ७ वर्षांपूर्वी सुरू झालेली एसआयपी गुंतवणुकीची रक्कम आतापर्यंत २५.६५ टक्के एक्सआयआरसह ३.८८ पटीनं वाढली आहे. या योजनेत ७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०,००० रुपयांच्या एसआयपीचे एकूण मूल्य आज ३२,५९,२०० रुपये झाले आहे.
7 / 8
क्वांट स्मॉल कॅप फंड - क्वांट स्मॉल कॅप फंडात ७ वर्षांपूर्वी सुरू झालेली एसआयपी गुंतवणुकीची रक्कम आतापर्यंत २७.०४ टक्के XIRR सह ४.१९ पटीनं वाढली आहे. या योजनेत ७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०,००० रुपयांच्या एसआयपीचं एकूण मूल्य आज ३५,१९,६०० रुपये झालं आहे.
8 / 8
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा