शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैसे तयार ठेवा! TATA च्या आयपीओची प्रतीक्षा संपली, तारखेची घोषणा; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:43 PM

1 / 7
टाटा टेकच्या आयपीओची (tata tech ipo) प्रतीक्षा आता संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुंतवणूकदार या आयपीओची आतुरतेने वाट पाहत होती. आता या आयपीओच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे
2 / 7
टाटा समूह २० वर्षांनंतर आयपीओ लाँच करत आहे. टाटा टेकचा (Tata Tech) आयपीओ २२ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि त्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. हा संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत येईल.
3 / 7
याचा अर्थ आयपीओमध्ये कोणताही नवीन इश्यू येणार नाही. तीन भागधारक आयपीओमधील त्यांचे काही शेअर्स विकतील. यापूर्वी आयपीओमध्ये ९.५७ कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार होती.
4 / 7
परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून ६.०८ कोटी शेअर्सची विक्री होणार आहे. यामुळे हा यापुढे भारतातील सर्वात मोठा आयपीओ राहणार नाही. तथापि, कंपनीने अद्याप प्राईज बँडबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. प्राइस बँड जाहीर झाल्यानंतर एकंदरीत चित्र स्पष्ट होईल.
5 / 7
ऑफर फॉर सेल अंतर्गत, टाटा मोटर्स ४६,२७५,००० शेअर्स, अल्फा टीसी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ९,७१६,८५३ आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड I ४,८५८,४२५ शेअर्स ऑफलोड करतील.
6 / 7
हे प्रमाण अनुक्रमे ११.४१ टक्के, २.४० टक्के आणि १.२० टक्के हिस्सा असेल. विक्रीच्या ऑफरपैकी १० टक्के टाटा टेक आणि टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. टाटा टेकनं मार्चमध्ये सेबीकडे आयपीओसाठी डीआरएचपी (DRHP) सादर केले होते.
7 / 7
टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सना (OEM) प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि डिजिटल सोल्युशन्स पुरवते. त्याच्या ग्राहकांमध्ये जग्वार लँड रोव्हर आणि एअरबस एसई सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जग्वार लँड रोव्हर ही टाटा समूहाची कंपनी आहे.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगTataटाटाSEBIसेबी