शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Money Saving Tips: पैसा हातात टिकत नाही, तुमच्या या ५ कॉमन सवयी बदला; गडगंज बँक बॅलन्स जमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 10:00 AM

1 / 7
अनेकदा एखादा व्यक्ती जास्त कमवत नसतानाही चांगले घर किंवा गाडी खरेदी करतो. कारण तो आधीपासून त्याचे पैसे वाचवत असतो. त्याचे फळ त्याला घर किंवा अन्य मोठ्या गोष्टीतून मिळते. मात्र, अनेकांचे असे होते की महिना येता येता खिसा पूर्ण रिकामा झालेला असतो. असे का होते? काहीही गुंतवणूक होत नाही आणि पगार संपून जातो.
2 / 7
या लोकांना एवढे पैसे मिळतात, परंतू ते कुठे संपतात ते त्याचे त्यालाच समजत नाही. त्यांनी जसजसा इन्मक वाढला तसतसा त्यांचा खर्चही वाढविला. अशाप्रकारच्या वाईट सवयींमुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. यामुळे त्यांच्याकडे महिन्याच्या अखेरीस घरातील व्यक्ती किंवा मित्रांकडे पैसे मागण्याची वेळ येते. जर तुम्हालाही अशा प्रकारची सवय असेल तर ती वेळीच बदलावी.
3 / 7
असे बरेच लोक आहेत ज्यांना पैसा हा हाताचा मळ असल्यासारखे वाटते. यामुळे ते लोक जेवढा पैसा मिळेल तेवढा तो उडवत बसतात. हा विचार चांगला पैसा कमविणाऱ्यांचा देखील असतो. जिथे 40 रुपयांत पोट भरता येते तिथे हे लोक पिझ्झा बर्गर मागवून ४०० रुपये घालवितात. असे व्यक्ती अनेकदा आर्थिक अडचणीत येतात.
4 / 7
एक म्हण आहे, जेवढी चादर तेवढेच पाय पसरावेत. परंतू अनेकजण तसे करत नाहीत. हे लोक कमाईपेक्षा जास्त खर्च करतात आणि नंतर कर्जबाजारी होतात. जर तुमचा पगार २०००० रुपये असेल आणि जर तुमचा खर्च २५ हजार असेल तर तुम्हाला पैसे वाचविण्यास होत नाही हे उघड आहे. यामुळे तुम्हीच तुमच्या खर्चावर लगाम लावायला सुरुवात करावी.
5 / 7
जे लोक आपले शौक पूर्ण करण्यासाठी शॉपिंग करतात, त्यांच्याकडे देखील पैशांची चणचण भासत असते. यामुळे तुम्ही विचारपूर्वक अशा वस्तू घ्या ज्यांची तुम्हाला खरोखरच गरज आहे किंवा कामाच्या आहेत. छंद म्हणून दुसरे काही काम किंवा गोष्ट शोधणे तुमच्यासाठी चांगले राहिल. जेणेकरून तुमचा पैसा वाचेल आणि तो दुसरीकडे कुठेतरी वापरता येईल.
6 / 7
अनेकांना शो ऑफ करण्याची सवय असते. यामुळे ते लोकांना दाखविण्यासाठी ब्रँडेड वस्तू घेतात, परंतू ते आतून कफल्लकच राहतात. जर तुम्हाला ९०० रुपयांत चांगल्या क्वालिटीची जिन्स मिळत असेल आणि जर तुम्ही ४९०० रुपयाची जिन्स खरेदी करत असाल तर तुम्ही तो शो ऑफच करता, नाही का. महागड्या कपड्यांमध्ये फिरला तरी खिशाला मोठे भोक पडलेले असते, यामुळे आर्थिक विवंचनेत असता त्याचे काय...
7 / 7
तुम्हाला तुमचे शाळेचे, कॉलेजचे दिवस आठवतात का? एक असा वेळ होता, जेव्हा तुम्ही लोक मित्रांसोबत असायचा तेव्हा छोट्या छोट्या दुकान, हॉटेलवर जायचा. एकत्र पैसे काढून काहीतरी ऑर्डर करत होता. त्यातच सर्व भागवत होता. मात्र, जेव्हा तुम्ही कमवू लागला तेव्हा महागड्या हॉटेलमध्ये जाऊ लागलात. जो वडापाव तुम्हाला १०-१५ रुपयांत मिळेल तो तुम्ही ५०-१०० रुपयांना खाऊ लागलात. पॉश कॅफे, रात्रीच्या पार्ट्या आदींत पैसे उडत जातात. दरवेळेला ५०० ते १००० रुपयांचा चुना लागतो. यामुळे अशा सवयींवर चाप लावावा, जेणेकरून पैसे वाचविता येतील.
टॅग्स :MONEYपैसा