शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Money Saving Tips: ओमायक्रॉन संकटात बजेट पुन्हा बिघडण्याची शक्यता; तिसऱ्या लाटेपूर्वी करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 10:50 AM

1 / 7
२०२२ च्या प्रारंभासोबतच ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे असंख्य लोकांना आधीच वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. नव्या वर्षात वित्तीय संकट टाळण्यासाठी पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
2 / 7
आपत्कालीन परिस्थिती वगळता इतर वेळी क्रेडिट कार्डचा वापर टाळा. त्यामुळे तुम्ही अनावश्यक कर्जाच्या जाळ्यात फसण्यापासून वाचाल. कोरोना काळात अनेक लोक क्रेडिट कार्डाची बिले भरू शकले नव्हते.
3 / 7
खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्तीय शिस्त आवश्यक असून, त्यासाठी आपल्या मासिक खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजेच घरगुती बजेट तयार करा. त्याचे काटेकोर पालन करा. त्यातून वायफळ खर्चाला आळा बसेल.
4 / 7
महत्त्व पटवून दिले. अचानक उद्भवणाऱ्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी आरोग्य विमा अवश्य काढा. कोरोनासाठी स्वतंत्रपणे ‘कोरोना कवच’ पॉलिसी तुम्ही घेऊ शकता.
5 / 7
भविष्यातील गरज लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक पर्याय निवडा. आधीच गुंतवणूक करीत असाल, तर ती सुरू ठेवा. मासिक गुंतवणूक अथवा सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) अत्यंत आवश्यक आहे.
6 / 7
गुंतवणूक करीत असताना आपल्याकडील सर्व पैसा एकाच योजनेत अथवा एकाच ठिकाणी गुंतवायचे टाळा. एकाच ठिकाणी पैसा लावलेला असेल, आणि नेमक्या त्याच ठिकाणच्या योजनेने योग्य परतावा दिला नाही, तर तुम्ही प्रचंड संकटात येऊ शकता.
7 / 7
अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी स्वत:चा आपत्कालीन निधी बनवा. बँकेचे बचत खाते किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडात तुम्ही ही रक्कम साठवून ठेवू शकता. ही रक्कम किमान ३ महिन्याचा तुमचा घरखर्च भागवू शकेल, एवढी असावी.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनMONEYपैसा