शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Money: पैशांची अचानक गरज लागल्यास काय कराल? हे आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:08 PM

1 / 4
तुम्हाला अचानक कोणत्याही कारणामुळे अधिक पैशांची गरज भासल्यास तुम्ही काय कराल? अशा परिस्थितीत कर्ज घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे का? किंवा तुम्ही तुमची काही जुनी गुंतवणूक म्हणजे एफडी तोडावी का? जाणून घेऊ...
2 / 4
तुम्हाला अचानक पैशांची गजर लागली तर कर्ज अथवा जुनी एफडी तोडणे गरजचे आहे का, तर या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकत नाही. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या गरजा आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची तयारी ठेवावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक आणि सर्व पर्यायांचा विचार करूनच घ्या. यासाठी, सर्व पर्यायांचे फायदे आणि तोटे यांची तुलना करणे फार महत्त्वाचे आहे.
3 / 4
तुमच्याकडे आवश्यक असलेले सर्व पैसे तुमच्या मुदत ठेवी किंवा म्युच्युअल फंडात पडून असल्यास तुम्ही काय करावे? या प्रश्नाचे उत्तर एफडी किंवा म्युच्युअल फंडावरील परताव्याच्या दराची आणि कर्जावरील व्याजदराची तुलना केल्यास मिळेल. तुम्हाला तुमच्या एफडीवर वार्षिक ७% दराने व्याज मिळत असेल आणि कर्ज घेतल्यावर तुम्हाला १२-१३% व्याज द्यावे लागत असेल, तर कर्ज घेणे शहाणपणाचे नाही. अशा परिस्थितीत एफडी तोडणे तुमच्यासाठी योग्य असू शकते.
4 / 4
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला पैशाची गरज किती मोठी आहे याचाही विचार करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एवढ्या मोठ्या रकमेची गरज असेल, जी तुमची गुंतवणूक संपवून उपलब्ध होणार नाही, तर कर्ज घेणे तुमची गरज असू शकते. आपत्कालीन परिस्थिती असेल, तर बँकांकडून ऑनलाइन वैयक्तिक कर्जाची सुविधा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
टॅग्स :MONEYपैसा