Money: Your pocket will be affected, these rules will change from July 1...
Money: तुमच्या खिशावर होणार परिणाम, १ जुलैपासून हे नियम बदलणार... By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 9:44 AM1 / 4दर महिन्याच्या १ तारखेस काही वित्तीय बदल देशात लागू होत असतात. त्याचा सामान्य लोकांच्या खिशावर बरा-वाईट परिणाम होत असतो. त्यानुसार, येत्या १ जुलैपासून सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करणारे ३ वित्तीय बदल देशात लागू होतील. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून सीएनजी-पीएनजीच्या किमतींपर्यंतच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. चला तर याबाबत जाणून घेऊ या…2 / 4एलपीजी सिलिंडरच्या दरात कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आढावा घेत असतात. त्यानुसार १ जुलै रोजी गॅसच्या किमतीत बदल होऊ शकतो. मे आणि एप्रिलच्या १ तारखेला सिलिंडर स्वस्त झाला होता.3 / 4विदेशात क्रेडिट कार्डावरील व्यवहारावर टीसीएस शुल्क लागू शकते. त्यानुसार, ७ लाखांपेक्षा अधिक खर्च झाल्यास २० टक्के टीसीएस लागेल. शिक्षण आणि वैद्यकीय खर्चावरील शुल्क मात्र घटून ५ टक्के होईल. विदेशातील शिक्षणासाठी ७ लाखांपेक्षा अधिक कर्ज घेतल्यास संबंधित रकमेवर ०.५ टक्के टीसीएस शुल्क लागेल.4 / 4सीएनजी व पीएनजीचे दर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वितरण कंपन्यांकडून निश्चित केले जातात. त्यानुसार १ जुलै रोजी सीएनजी व पीएनजीच्या किमतींत बदल होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications